Full Width(True/False)

जिओने लाँच केले ५ नवीन प्रीपेड प्लान्स, डेटा-कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली : ने बेसिक Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह नवीन लाँच केले होते. हे प्लान्स आजपासून (१ सप्टेंबर) ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. आधीच्या ग्राहकांना जुना प्लान समाप्त होईपर्यंत तेच फायदे मिळत राहतील. वाचा: जिओ या प्लान्समध्ये नवीन Disney+ Hotstar मोबाइल-ओनली सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. कंपनीच्या ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि १ वर्षासाठी Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. ग्राहकांना या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळेल. कंपनीच्या २,५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. इतर बेनिफिट्स समान आहे. याच प्रकारे ६६६ रुपयांचा प्लान ५६ दिवस वैधतेसह येतो. या प्लानमध्ये २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. जिओच्या नवीन ८८८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि एक वर्षासाठी Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळेल. प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यासोबतच कंपनीने ५४९ रुपयांचा डेटा अॅड ऑन प्लान देखील आणला आहे. याची वैधता ५६ दिवस असून यात दररोज १.५ जीबी डेटा आणि वर्षभरासाठी Disney+ Hotstar मोबाइलचे सबस्क्रिप्शन मिळेल. 499 रुपयांचा Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन प्लान Disney+ Hotstar चा हेच मोबाइल सबस्क्रिप्शन वरील सर्व प्लान्समध्ये ग्राहकांना मिळणार आहे. Disney+ Hotstar नवीन प्लान्स सादर केले असून, हे प्लान्स १ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. ४९९ रुपयांचा नवीन Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन प्लान एक वर्षासाठी असून, हा मोबाइल ओनली प्लान आहे. हा एकावेळी केवळ एकाच डिव्हाइसवर सपोर्ट करतो. सोबतच, स्टीरियो ऑडिओ क्वालिटी आणि ७२०p व्हीडिओ क्वालिटी मिळेल. या ओटीटी सर्व्हिसद्वारे यूजर्स Disney+ originals, चे टीव्ही शो, , Star Wars, National Geographic, HBO, FXआणि Showtime वरील कॉन्टेंट पाहू शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38vmfI0