Full Width(True/False)

Amazon चा खास रोबोट Astro लाँच, घरातील सर्व काम करण्यास मदत करणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः ई-कॉमर्स कंपनी अमेजन (Amazon) ने घराची देखभाल आणि काम करण्यासाठी एक खास रोबोट लाँच केला आहे. याचे नाव Astro आहे. या रोबोटचा लूक एनिमेटेड कॅरेक्टर Wall-E शी मिळता जुळता आहे. या रोबोट मध्ये कनेक्टिविटीसाठी कॅमेरा पासून सेन्सर पर्यंत दिले आहे. यासोबतच रोबोट मध्ये AI टेक्नोलॉजी दिली आहे. तसेच अमेझॉन अलेक्साचा सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा डिव्हाइस युजर्सच्या खूप कामी येवू शकतो. ची किंमत Amazon Astro रोबोटची किंमत १,००० डॉलर म्हणजेच जवळपास ७४ हजार १७० रुपये ठेवण्यात आली आहे. या रोबोटला २०२१ च्या अखेर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. भारतासह अन्य देशात हा रोबोट कधीपर्यंत उपलब्ध होणार, यासंबंधीची माहिती अद्याप समोर आली नाही. Amazon Astro चे फीचर या रोबोटमध्ये १७ इंचाची स्क्रीन दिली आहे. याच्या स्क्रीनमध्ये डोळ्यांनी पाहिले जावू शकतो. हे व्यक्तीच्या डोळ्याप्रमाणे झपकते. या रोबोट मध्ये अमेझॉन अलेक्सा व्हाइस असिस्टेंटचा सपोर्ट मिळेल. याशिवाय, हे डिव्हाइस युजर्सला आवश्यक कार्यात रिमाइंडर देते. लोकांचे चेहरे ओळखण्यात सक्षम Amazon Astro रोबोट चेहरे आणि घरातील सदस्यांचा स्वभाव ओळखण्यात सक्षम आहे. यात अमेझॉन अलेक्सा व्हाइस असिस्टेंटची सुविधा दिली आहे. अमेझॉनने ऑगस्ट मध्ये ला लाँच केला होता. या डिव्हाइसची भारतात किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. अमेझॉन इको शो ८ मध्ये ८ इंचाची स्क्रीन दिली आहे. युजर्स यात अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मची वेब सीरीज मूव्ही चालवू शकता. याशिवाय, या डिव्हाइस मध्ये स्पॉटीफाय, अमेझॉन प्राइम म्यूझिक, अॅप म्यूझिक आणि हंगामाचे कंटेटचे अॅक्सेस मिळते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kNDon6