नवी दिल्ली : ने आपल्या मल्टी-डिव्हाइस फीचरला अपडेट करण्यास सुरुवात केले आहे. अपडेट केलेला ‘लिंक्ड डिव्हाइस’ हा पर्याय मुख्य गेटवे स्वरुपात एक सेकेंडरी स्मार्टफोन, अँड्राइड अथवा आयओएसचा वापर करता येईल. प्रायमरी स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसले तरीही हे फीचर वापरता येईल. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. लवकरच अँड्राइड आणि आयओएसवर व्हॉट्सअॅप बीटा यूजर्ससाठी फीचर रोलआउट केले जाईल. वाचा: WABetaInfo ने नवीन मल्टी-डिव्हाइस २.० चा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात दिसत आहे की, स्क्रीनशॉट एक स्मार्टफोनचा आहे व एक समान विंडो दिसत आहे. व्हॉट्सअॅप लिंक करण्यात आलेल्या कॉम्प्यूटरवर लोड करताना जसे दिसते तसे दिसत आहे. यात डाउनलोडिंग, रिसेंट मेसेजेस असे लिहिलेले आहे. याचा अर्थ सेकेंडरी फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी प्रायमरी स्मार्टफोनमध्ये इंटरनेटची आवश्यकता नाही. एकदा लिंक झाल्यानंतर नवीन डिव्हाइस आपोआप चॅट बॅकअप डाउनलोड करेल. हे फीचर रोल आउट झाल्यास सध्या व्हॉट्सअॅप मल्टीपल लिंक्ड डिव्हाइस फीचरचा अडथळा दूर होईल. यूजर्स एकच नंबर वापरून वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप अकाउंट वापरता येईल, अशा फीचरची वाट पाहत आहेत. सध्या हे फीचर चार डिव्हाइस कनेक्ट करण्याची परवानगी देते, मात्र यातील केवळ एकच स्मार्टफोन आहे. रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर आयपॅडवर पाहण्यात आले आहे. मल्टी डिव्हाइस २.० फीचर आयपॅड आणि आयफोनसाठी व्हॉट्सअॅप लिंकला इनेबल करेल. अशावेळी यूजर्स आयफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसतानाही आयपॅडवरून मेसेज आणि कॉल करू शकतील. सध्या टॅबलेटमध्ये देखील मल्टी डिव्हाइस फीचर सपोर्टेड नाही. त्यामुळे हे अपडेट टॅबलेट यूजर्ससाठी देखील असेल. सध्या व्हॉट्सअॅपचे मल्टी डिव्हाइस फीचर सर्व व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅप बिझनेस बिटा व्हर्जनसह काही ठराविक देशातील यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरद्वारे एकाचवेळी चार डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XY9rYi