नवी दिल्लीः ई-कॉमर्स कंपनी Amazon चा वार्षीक आयोजित होणारा सेल अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल () ची अखेर घोषणा करण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनिष तिवारी यांनी या सेलची आज घोषणा केली. Amazon Great indian Festival सेल यावर्षी ४ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. Amazon ने यावेळी फेस्टिवल सेलला #KhushiyonKeDibbe ही टॅगलाइन दिली आहे. या सेलमध्ये ग्राहकांसोबत प्रोडक्ट विक्रेत्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. अमेझॉनचा हा सेल जवळपास एक महिना सुरू राहणार आहे. या दरम्यान ग्राहकांना अनेक डिस्काउंट ऑफर आणि आकर्षक गिफ्ट मिळू शकतील. सोबत स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज सह इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसची लाँचिंग केली जाणार आहे. Amazon Prime मेंबर्ससाठी Amazon Great Indian Festival Sale लवकर अॅक्सेस मिळेल. ऑफर आणि डिस्काउंट यावेळी Amazon ने Alexa इन-बिल्ट डिवाइस ला जबरदस्त डिस्काउंट ऑफर वर उपलब्ध करण्यात येणार आहे. सोबत ग्राहक Amazon अॅप वरुन बोलून प्रोडक्ट्स खरेदी करू शकतील. Amazon अॅपवरून खरेदी करताना ग्राहकांना ३०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. सोबत अनेक जबरदस्त ऑफर दिले जातील. सोबत जबरदस्त ऑफर दिले जातील. HDFC सह अनेक सर्व बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना सूट दिली जाणार आहे. तसेच नो कॉस्ट EMI,कॅशबॅक, वॉरंटी आणि कॉम्बो ऑफर मिळू शकणार आहे. ग्राहक ५% रिवार्ड पॉइंट्सचा आनंद घेण्यासाठी ऍमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड सह परवडणारे पर्याय बघू शकतात ज्यामध्ये जॉइनिंग बोनस म्हणून ७५० रूपये, ६०,००० रूपयांपर्यंत तात्काळ क्रेडिट होण्यासह १५० रूपये मिळण्यासाठी ऍमेझॉन पे लेटरसाठी साईन अप, १००० रूपयांचे गिफ्ट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी १००० रूपये बॅक रिवार्ड, अमेझॉन पे बॅलन्स ला पैसे जमा करण्यासाठी 200 रूपयांचे रिवार्ड अशा सुविधांचा समावेश आहे. मराठी भाषेत खरेदी करता येणार ग्राहक इंग्लीश, हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, आणि कन्नड तसेच नवीन चालू झालेल्या बंगाली आणि मराठी यांसह आपल्या आवडत्या भाषांमध्ये खरेदी करू शकतात. ग्राहक अलेक्साने प्रस्तुत व्हॉईस शॉपिंग सह इंग्लीश सोबतच आता हिंदीमध्ये सुद्धा त्यांचा आवाज वापरून खरेदी करू शकतात. भारतामध्ये प्राईम व्हिडीओ चॅनलची सुरूवात भारतामध्ये प्राईम व्हिडीओ चॅनलची सुरूवात झाल्यासह, प्राईम सदस्यांना अमर्याद अनुभव मिळेल आणि लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसच्या वैविध्यपूर्ण सेटमधून कन्टेंटच्या विशिष्ट स्लेटमध्ये प्रवेश मिळेल; यामुळे प्राईम सदस्यांना प्रसिद्ध OTT सर्व्हिसवर ऍड-ऑन सबस्क्रिप्शनसाठी पर्याय मिळेल आणि ते ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ ऍप आणि भारतामधील वेबसाईट यांवर त्यांचे कन्टेन्ट स्ट्रीम करू शकतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39xKghV