देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स साइट Amazon वर ३ ऑक्टोबरपासून ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२१ सुरू होणार आहे. हा सेल कधीपर्यंत चालेल याची कंपनीने माहिती दिलेली नाही. कंपनीने या सेलमध्ये उपलब्ध होणाऱ्या अनेक स्मार्टफोन्सचा खुलासा केला आहे. स्मार्टफोन्सची मोठी रेंज या सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध होईल. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Indian Festival सेलमध्ये चांगली संधी आहे. अॅमेझॉनच्या या सेलमध्ये अनेक शानदार स्मार्टफोन्सला १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. या किंमतीत सेलमध्ये तुम्हाला Realme Narzo 30, Redmi Note 10S, Redmi 9 Power आणि Samsung Galaxy M21 2021 ला खरेदी करू शकता. Amazon Great Indian Festival सेलमध्ये कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या या फोन्सच्या फीचर्सविषयी जाणून घेऊया.

Realme Narzo 30
Realme Narzo 30 स्मार्टफोनमध्ये ६.५० इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Helio G९५ प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनमध्ये रियरला ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल दुसरा कॅमेरा, २ मेगापिक्सल तिसरा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,४९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये आणखी सूट मिळेल.
Redmi Note 10S
या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. यात ऑक्टा कोर MediaTek Helio G९५ प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२.५ वर काम करतो. यात ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. फोनच्या रियरला ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. याशिवाय ८ मेगापिक्सल दुसरा कॅमेरा, २ मेगापिक्सल तिसरा आणि २ मेगापिक्सल चौथा कॅमेरा मिळतो. फ्रंटला १३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनची किंमत १६,४९९ रुपये असून, सेलमध्ये शानदार ऑफर्सचा लाभ मिळेल.
Redmi 9 Power
Redmi 9 Power मध्ये ६.३ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसरसह येतो. फोन अँड्राइड १० आधारित MIUI १२ वर काम करतो. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये रियरला ४८ + ८ + २ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो. यात ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी मिळते. फोन ११,४९९ रुपयात उपलब्ध असून, सेलमध्ये बंपर डिस्काउंट मिळेल.
Samsung Galaxy M21 2021
सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.४० इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २३४०x१०८० पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos ९६११ प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्राइड ११ आधारित One UI Core ३.१ वर काम करतो. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. यात रियरला ४८ + ८ + ५ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. या फोनला डिस्काउंटनंतर १२,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध केले जाईल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ohiTkV