Full Width(True/False)

सिम स्वॅपिंग फ्रॉड: आयुष्याची कमाई सेकंदात होऊ शकते गायब, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सध्या मोबाइल बँकिंग (Net Banking) बँकिंगच्या तुलनेत सरळ झाली आहे. कारण, मोबाइल बँकिंग खूपच सोपी आहे. याद्वारे लोक कधी कधी बँक खात्याशी लॉगइन करू शकता. कोणताही व्यक्ती एकदा आपल्या सर्व देवाण घेवाणची तपासणी करू शकता. तुम्ही सिंगल क्लिकवरून आपल्या बँकिंग अॅपमध्ये लॉग इन करू शकता. परंतु, याचा फायदा सायबर गुन्हेगार उचलत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक मोबाइल बँकिंग संबंधी एक मोठा फ्रॉड समोर आला आहे. याचे नाव सिम स्वॅपिंग फ्रॉड आहे. सिम स्वॅप फ्रॉड काय आहे ? सिम स्वॅप फ्रॉड सिम कार्डला बदलणे किंवा त्याच नंबरवर दुसरे सिम कार्ड घेणे आहे. सिम स्वॅपिंग मध्ये तुमचा मोबाइल नंबरने एक नवीन सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर तुमच्या मोबाइलचे नेटवर्क गायब होते. त्यानंतर हॅकरकडील मोबाइल नंबर त्याचे सीम कार्ड चालू होते. याचाच गैरफायदा घेत तुमचा नंबर ओटीपी मागतो. त्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे गायब केले जातात. कसे केले जाते लक्ष्य? सायबर गुन्हेगार फिशिंग किंवा मेलवेयर द्वारे तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि बँक अकाउंट्सची डिटेल्स मिळवतात. त्यानंतर मोबाइल हरवणे, सिम कार्ड खराब होण्याचे कारण, देवून मोबाइल सर्विस प्रोव्हाइडरला योग्य ग्राहकाची ओळखीसोबत संपर्क करतात. कस्टमर वेरिफिकेशन नंतर मोबाइल सर्विस प्रोव्हाइडर ग्राहकांकडील जुन्या सिम कार्डला डिअॅक्टिव्ह करतात. गुन्हेगार नवीन सिम कार्ड जारी करतात. ग्राहकांच्या फोनवर नेटवर्क उपलब्ध नसते. आता ग्राहकांना आपल्या फोनवर कोणताही एसएमएस, अलर्ट, ओटीपी, यूआरएन आदी मिळत नाहीत. Sim-Swap पासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा अलर्ट राहण्यासाठी आणि मोबाइल फोनचे नेटवर्क कनेक्टिविटीचे स्टेट्स संबंधी माहिती ठेवा. जर तुम्हाला कोणताही कॉल किंवा एसएमएस नोटिफिकिशन मिळत नसेल तर काही तरी गडबड आहे. तुमच्या मोबाइल ऑपरेटरशी संपर्क करीत राहा. यासाठी तुम्ही तात्काळ मोबाइल ऑपरेटरशी संपर्क करा. आपल्या फोनवर लागोपाठ अज्ञात कॉल येत असल्यास फोनला स्विच ऑफ करू नका. फक्त त्यांना उत्तरे देवू नका. हे तुम्हाला फसवण्यासाठी असे करू शकतात. फोनला सायलेंट वर ठेवा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3urB8Fp