नवी दिल्ली : स्मार्टफोनचा वापर आता केवळ फोटो काढणे आणि चॅटिंग करण्यापूरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक आर्थिक कामे देखील फोनच्या मदतीने शक्य होतात. याशिवाय खासगी डेटा देखील यात स्टोर असतो. अशा स्थितीमध्ये फोनला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. अनेकदा नकळत झालेल्या चुकांमुळे स्मार्टफोनमधील डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायला हवे यासंदर्भात जाणून घेऊया. वाचा:
- फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करू नका. अनेकजण पासवर्ड विसण्याची शक्यता असल्याने कायमचा सेव्ह करतात. मात्र, तुमचे अकाउंट हॅक झाले अथवा फोन चोरीला गेल्यास पासवर्डचा वापर दुसरी व्यक्ती करू शकता. तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजरचा देखील वापर करू शकता.
- सिक्योरिटीसाठी चा वापर करा. इंटरनेटवर तुम्हाला अनेक VPN मिळतील. यातील योग्य VPN निवडा. चुकीचा VPN निवडल्यास हॅक होण्याची शक्यता आहे.
- स्मार्टफोन Root करणे बंद करा. असे केल्याने फोनची सिक्योरिटी कमकुवत होते. यामुळे हॅकर्स सहत तुमचा फोन हॅक करू शकतात. अनेकांना वाटते की Root केल्याने फोनची बॅटरी वाढते, मात्र असे नाहीये.
- थर्ट पार्टीला अॅप्सला फोनमध्ये इंस्टॉल करू नका. असे केल्याने तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मॅलवेअर फाइल्सचा शिरकाव होऊ शकता. यामुळे तुमचा फोन हॅक होईल. ला केवळ स्टोरवरून डाउनलोड करावे व डाउनलोड करण्याआधी रिव्ह्यू आणि रेटिंग तपासावे.
- कोणत्याही अॅपला परमिशन देताना आपण विचार करत नाही. डाउनलोड केल्यानंतर अॅप वापरण्यासाठी सर्वकाही allow करतो. मात्र, यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे गरज असेल तेवढ्याच गोष्टीची परमिशन अॅपला द्यावी.
- तुमचा डेटा योग्य ठिकाणी बॅकअप करणे गरजेचे आहे. केवळ गुगल ड्राइव्ह, हार्ड डिस्क अथवा लोकल स्टोरेजमध्ये डेटा स्टोर करावा. इतर कोणत्याही ठिकाणी बॅकअप करू नये.
- Open Source wifi वर कनेक्ट करू नका. यामुळे तुमचा फोन सहज हॅक होऊ शकतो. वाय-फाय आणि ब्लूटूथचा वापर करत नसाल तर अशावेळी ते बंद करून ठेवावे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zz5WW9