Full Width(True/False)

तिहार जेलमधूनच सुकेश करायचा जॅकलिन फर्नांडिसला फोन

मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री हिची नुकतीच ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने जॅकलिनची तब्बल ५ तास चौकशी केली होती. ही चौकशी याने केलेल्या २०० कोटींच्या फसवणुकीसंबंधित होती. जॅकलिनदेखील सुकेशच्या फसवणुकीला बळी पडली होती. आता या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. सुकेश तिहार तुरुंगातून खोट्या कॉलर आयडीवरून जॅकलिनला फोन करत असायचा असे समोर आले. ने सोमवारी जॅकलिनला या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावलं होतं. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सुकेश तुरूंगातून जॅकलिनसोबतच आणखीही काही व्यक्तींना फोन करत असे. सुकेश जॅकलिनसोबत खोट्या कॉलर आयडीवरून बोलत असे. सुकेशने जॅकलिनला त्याचं नावदेखील खोटं सांगितलं होतं. एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून तो जॅकलिनला फोन करत असे. जॅकलिनचा सुकेशवर विश्वास बसल्यानंतर त्याने तिच्यासाठी अनेकदा महागडी गिफ्ट, फुलं आणि चॉकलेट पाठवली होती. सुकेशकडे २४ पेक्षाही जास्त खोटे कॉलर आयडी आहेत, ज्यावरून तो सगळ्यांची फसवणूक करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, जॅकलिनसोबत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची सुकेशने फसवणूक केली आहे परंतु, या प्रकरणाची गोपनीयता आणि सुरक्षिततेचा विचार करता या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. मागील आठवड्यात ईडीने सुकेशच्या चेन्नईमधील घरावर छापा मारला होता. त्यात ८२ लाखांची रक्कम आणि १५ महागड्या विदेशी गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या. २०० कोटींच्या घोट्याळ्याप्रकरणात जॅकलिन माफीची साक्षीदार होण्यास तयार असल्याचं वृत्त आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zzFvjn