Full Width(True/False)

दमदार बॅटरीचे रेडमीचे हे दोन स्मार्टफोन येताहेत, किंमत १० हजारांपेक्षा कमी, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः Xiaomi गेल्यावर्षी प्रमाणे Redmi 9 सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. MySmartPrice च्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, Redmi आणि लवकरच लाँच करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या Redmi 9 आणि चे रिब्रँड व्हेरियंट असण्याची शक्यता आहे. Xiaomi ने गेल्यावर्षी भारतात Redmi 9 आणि Redmi 9A ची घोषणा केली होती. नवीन रेडमी स्मार्टफोन नवीन स्टोरेज व्हेरियंट आणि एक नवीन रंगासोबत येईल. या स्मार्टफोनची घोषणा कधी केली जाईल, याची माहिती अद्याप नाही. Redmi 9 Activ चे संभावित स्पेसिफिकेशंस Redmi 9 Activ च्या वॅनिला Redmi 9 वर आधारित असण्याची अफवा आहे. आम्ही Redmi 9 Activ च्या MediaTek Helio G35 चिपसेट सोबत येण्याची अपेक्षा करू शकतो. स्मार्टफोन दोन स्टोरेज कॉन्फिगरेशन मध्ये उपलब्ध असेल. एक ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत तर दुसरा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सोबत येईल. याशिवाय, रिपोर्टनुसार, Redmi 9 एक्टिव नवीन मॅटेलिक पर्पल रंगात येईल. अन्य स्पेसिफिकेशन्सच्या माहितीनुसार, रेडमी ९ अॅक्टिव मध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असू शकतो. हा १३ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh ची बॅटरी सोबत येवू शकतो. आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. रेडमी ९ अॅक्टिव मध्ये जुन्या रेडमी ९ स्मार्टफोनपेक्षा काही वेगळी डिझाइन आणि फीचर्स असतील की माहिती नाही. Redmi 9A Sport चे स्पेसिफिकेशंस Redmi 9A Sport च्या नवीन मॅटेलिक ब्लू मध्ये येण्याची अफवा आहे. स्मार्टफोन 2GB + 32GB आणि 3GB + 32GB स्टोरेज मध्ये येणार आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, Helio G25 चिपसेट, 13MP रियर कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी सोबत येवू शकतो. स्मार्टफोनच्या बाजारात Xiaomi ची सर्वात स्वस्त फोन असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39yyDHD