Full Width(True/False)

HP चा ११ इंचाचा टॅबलेट कम लॅपटॉप लाँच, किंमत आणि फीचर्स पाहा

नवी दिल्ली : HP ने HP 11-inch Tablet PC लाँच केला असून हा टॅब्लेट डिटॅचेबल कीबोर्डसह येतो. टॅब्लेट डिस्प्लेच्या दोन्ही बाजूंना चुंबकीय क्लिप आहेत, ज्याच्या मदतीने टॅब्लेट लँडस्केप आणि पोर्ट्रेट ओरिएंटेशनमध्ये फिरवता येतो. विशेष म्हणजे, यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे जो युजर्सच्या सोयीनुसार वापरण्यासाठी फ्लिप करता येतो. या व्यतिरिक्त, HP ने लाँचच्या वेळी काही इतर प्रोडक्टसची देखील घोषणा केली असून यामध्ये एक लॅपटॉप, दोन पीसी आणि दोन डेस्कटॉप मॉनिटर्सचा समावेश आहे. वाचा: HP 11-inch Tablet PC किंमत आणि उपलब्धता : HP 11-inch Tablet PC डिसेंबरपासून कंपनीच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होणार असून कंपनीने या पीसीची सुरुवातीची किंमत $ ५९९ (सुमारे ४४,२०० रुपये) ठेवली आहे. याव्यतिरिक्त, एचपी टॅब्लेट त्याच वेळी बेस्ट बाय वर देखील उपलब्ध असेल. सध्या भारतात त्याच्या उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती नाही . एचपी 11-इंच टॅब्लेट पीसी सिंगल सिल्व्हर कलर पर्यायामध्ये येतो. HP 11-inch Tablet PC ची वैशिष्ट्ये: एHP 11-inch Tablet PC 11-इंच (२,१६०x१,४४० पिक्सेल) आयपीएस टचस्क्रीनसह ४०० निट्स जास्तीत जास्त चमक आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ संरक्षणासह येतो. हे इंटेल पेंटियम सिल्व्हर एन ६००० क्वाड-कोर प्रोसेसरद्वारे इंटेल यूएचडी ग्राफिक्ससह समर्थित असून प्रोसेसर ४GB LPDDR4x RAM आणि १२८ GB M.2 PCIe NVMe SSD सह जोडलेला आहे. HP 11-inch Tablet PC १३ मेगापिक्सेल कॅमेरासह येतो जो फिरवता येतो. युजरच्या गरजेनुसार याचा सेल्फी कॅमेरा किंवा वेबकॅम म्हणून वापर केला जाऊ शकतो. तसेच, HP 11-inch Tablet PC त्याच्या कीबोर्डवर लँडस्केप आणि पोर्ट्रेट ओरिएंटेशन दोन्हीमध्ये बसवता येतो. हे टॅब्लेटला विंडोज ११ च्या स्नॅप लेआउटचा दोन्ही डिस्प्ले ओरिएंटेशनमध्ये लाभ घेण्यास अनुमती देते. डिव्हाइस वैकल्पिक एचपी रिचार्जेबल टिल्ट पेनसह देखील येते. यात कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय ६ आणि ब्लूटूथ v5 सारखी फीचर्स देण्यात आली आहे. HP 11-inch Tablet PC ३२.२ kWhr बॅटरी आणि ३०W पॉवर अडॅप्टरसह येत असून कीबोर्डशिवाय त्याचे वजन ६६० ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EJE9pb