Full Width(True/False)

'बिग बॉस मराठी ३' मध्ये सहभागी होण्याबद्दल प्रणित हाटेचा खुलासा

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'बिग बॉस मराठी' चा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. '' साठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कार्यक्रमाच्या प्रोमोंमुळे प्रेक्षक आतुरतेने कार्यक्रमाची वाट पाहत आहेत. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांच्या नावाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. यावेळेस कार्यक्रमात 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगा म्हणजेच सहभागी होणार असल्याची देखील चर्चा होती. परंतु, प्रणितने मुलाखतीत या केवळ अफवा असल्याचं सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रणितने आपण ' ३' मध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिने म्हटलं आहे. प्रणित म्हणाला की, 'मी 'बिग बॉस मराठी ३' मध्ये सहभागी होत नाहीए. या लोकप्रिय कार्यक्रमाचा एक भाग होऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मलाही आवडलं असतं परंतु, कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून मला कोणतीही विचारणा झालेली नाही. मला माहीत आहे की प्रेक्षकांना असं वाटतंय मी कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहे. पण तसं नाहीए. निदान यावेळेस तरी मी कार्यक्रमाचा भाग नाहीये.' प्रणित 'बिग बॉस मराठी ३' मधील अपेक्षित कलाकारांपैकी एक नाव होतं. प्रणितच्या या खुलाशाने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. प्रेक्षक प्रणितला कार्यक्रमात पाहण्यासाठी उत्सुक होते परंतु, या बातमीनंतर त्यांचा हिरमोड झाला. यासोबतच 'हे मन बावरे' मालिकेतील अभिनेता संग्राम समेळ आणि 'फतेशिकस्त' चित्रपटातील अभिनेत्री नेहा जोशी हे देखील कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 'बिग बॉस मराठी ३' १९ सप्टेंबरपासून कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BJCyNZ