मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अन्नपदार्थांची डिलिव्हरी करणा-या अॅपच्या दोन नवीन जाहिरातींची चर्चा आहे. झोमॅटोने रिलीज केलेल्या या दोन नवीन जाहिरातींमध्ये एकात तर दुस-या जाहिरातीमध्ये आहे. या जाहिराती पाहून काहींनी कौतुक केले आहे तर काहींनी कंपनीवर टीका केली आहे. कंपनीच्या डिलिवरी बॉइजना कठीण परिस्थितीत आणि कमी मानधनावर काम करावे लागते आहे. तर दुसरीकडे कंपनी मात्र जाहिरातींवर मोठमोठ्या कलाकारांना घेऊन वारेमाप पैसे खर्च करत आहे, असा या टीकेचा सूर आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या मोठ्या टीकेला उत्तर देण्यासाठी झोमॅटोने अखेर आपली बाजू मांडली आहे. याप्रकरणी कंपनीने जो खुलासा केला आहे त्यात म्हटले आहे की, आम्ही फूड डिलिव्हरी करणारे आमचे सर्व बॉईज हे आमच्यासाठी 'हिरो' आहेत. आम्हाला विश्वास आहे, आमच्या जाहिरातींमधून योग्य तो संदेश दिला जातो. परंतु काही लोकांनी त्यातून चुकीचा अर्थ काढला जात आहे. या जाहिरातींमधून आमचे डिलिवरी एक्झिक्युटिव्हज ग्राहकांप्रती वचनबद्ध आहेत हे दाखवले आहे. झोमॅटोने त्यांच्या निवेदनात असेही नमूद केले आहे की या जाहिरातींच्या माध्यमातून त्यांना असाही संदेश द्यायचा आहे की झोमॅटोच्या डिलिवरी बॉईजसोबत चांगला व्यवहार करायला पाहिजे. असे व्यवहार फार कमी लोक करतात. दरम्यान, झोमॅटोवर अनेकवेळा आरोप झाले आहेत की ते त्यांच्या डिलिवरी बॉईजचे शोषण करतात आणि त्यांचे पिळवणूक करतात. यासंदर्भातही झोमॅटोने स्पष्टीकरण दिले आहे, डिलिवरी बॉईज जेवढा वेळ काम करत आहेत त्यासाठी त्यांना योग्य ते मानधन दिले जाते. झोमॅटो कंपनीने स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्यावर होणारी टीका सातत्याने सुरूच आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38JM6Mt