Full Width(True/False)

'कोटा फॅक्टरी'चा दुसरा सीझन लवकरच; टीझर सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई:भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे आयआयटीची प्रवेश परीक्षा. देशभरातील लाखो विद्यार्थी अथक मेहनत करत परीक्षेची तयारी करुन आपलं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची मेहनत आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याची गोष्ट सांगणारी वेब सीरिज म्हणजे ‘’. या सीरिजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असून लवकरच या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पहिल्या सीझनच्या यशानंतर आता या सीरिजचा दुसरा सीझन २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्ये नव्या सीझनविषयी उत्सुकता आहे. भावला 'कोटा फॅक्टरी' सीरिजच्या पहिल्या सीझनमझ्ये मध्ये शिक्षकासह मार्गदर्शकाची भूमिका निभावणारा जितू भैय्या प्रेक्षकांना भावला. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध टप्प्यावर जितू भैय्यासारखी व्यक्ती भेटत असते आणि पुढचा मार्ग सुकर करत असते. प्रेक्षकांनी जितू भैय्याचं पात्र रिलेट केलं. हे पात्र अभिनेता जितेंद्र कुमारने साकारलं आहे. जितू भैय्याने सांगितलेले जीवनमंत्र आजही प्रेरणादायी कोट स्वरुपात व्हायरल होत आहेत. विषेश म्हणजे दुसरा सीझन टीव्हीएफसोबतच नेटफ्लिक्सवरही रिलीज होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38sk5ZF