Full Width(True/False)

दिवाळीच्याआधीच रियलमीचा धमाका, फेस्टिव्ह सीझनमध्ये यूजर्सला देणार तब्बल ५०० कोटी रुपयांच्या ऑफर्स

नवी दिल्ली : ब्रँड ऑक्टोबरच्या सुरुवातीला फेस्टिव्ह सीझनमध्ये विक्रीसाठी ५०० कोटी रुपयांच्या ऑफर्स देणार आहे. या ऑफर्सचा लाभ कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि पार्टनर प्लॅटफॉर्मवर मिळेल. ही ऑफर कंपनीच्या स्मार्टफोन आणि एआयओटी प्रोडक्ट्सवर लागू असेल. वाचा: , यूरोप आणि लॅटिन अमेरिकेचे व्हाइस प्रेसिडेंट सीईओ माधव शेठ म्हणाले की, आम्ही रियलमी फेस्टिव्ह डेज सेल दरम्यान ग्राहकांना शानदार डील आणि ऑफर्स देणार आहोत. काउंटरपॉइंट रिसर्चनुच्या एका रिपोर्टनुसार, रियलमी भारतीय बाजारात ५जी स्मार्टफोन शिपमेंटमध्ये आघाडीवर आहे आणि २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची हिस्सेदारी २२ टक्के होती. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांचे पुढील लक्ष्य १०० मिलियनचे असेल. २०२२ पर्यंत १०० मिलियन हँडसेटची शॉपिंग आणि २०२३ मध्ये देखील हे टार्गेट पूर्ण करायचे आहे. काउंटरप्वाइंटनुसार, रियलमीने २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत १.५ कोटी शिपमेंट आणि १३५.१ टक्के वार्षिक ग्रोथसह सहावा क्रमांक मिळवला आहे. जगभरातील १० कोटी रियलमी यूजर्सपैकी ५ कोटी यूजर्स एकट्या भारतात आहेत. चिपसेटचा तुटवडा असतानाही कंपनीने अपकमिंग फेस्टिव्ह सीझनसाठी ६ मिलियन हँडसेट आणि दोन मिलियन आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऑफ थिंग्स प्रोडक्ट्स विक्रीचे लक्ष्य निश्चित केले आहे. नुकतेच ला केले लाँच कंपनीने काही दिवसांपूर्वीच एंट्री लेव्हल सी-सीरिजमधील नवीन फोन C25Y ला लाँच केले आहे. हा फोन ५० मेगापिक्सल एआय ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. याची किंमत १०,९९९ रुपये आहे. रियलमी सी२५वाय दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आमि ४ जीबी +१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. फोन ग्लेशियर ब्लू आणि मेटल ग्रे रंगात २७ सप्टेंबरपासून कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. याद्वारे यूजर ८१६०x६१४४ पिक्सलपर्यंतचे फोटो काढू शकतात. यात एआय ब्यूटी फंक्शनसह ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशिया ८८.७ टक्के आणि यूनिसोक टी६१० प्रोसेसर मिळतो. ग्राफिक्ससाठी यात एआरएम माली जी52 जीपीयू दिले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kCu5pQ