Full Width(True/False)

सिद्धार्थ शुक्लाची इन्स्टाग्रामवरची शेवटची पोस्ट होतेय व्हायरल

मुंबई : अभिनेता याच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन सृष्टीतील प्रत्येकाने तीव्र दुःख व्यक्त केले. ४० वर्षांचा सिद्धार्थ असा अचानक सोडून गेला यावर अजूनही अनेकांना विश्वास बसत नाहीए. सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हृदयवविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे इस्पितळातून सांगण्यात आले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची इन्स्टाग्रामवरची शेवटची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याने २४ ऑगस्टला शेवटची पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये स्वतःचा फोटो पोस्ट करत सिद्धार्थने फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते. त्याने लिहिले होते की, 'फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद! तुम्ही स्वतःचे आयुष्य संकटात टाकले आहे. वेळेचे बंधन न पाळता काम करत आहात आणि प्रत्येक रुग्णाची सेवा करून त्यांना बरे करत आहात. ज्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब नाही त्यांना तुम्ही दिलास देत आहात. तुम्ही सर्वजण खरोखरच शूरवीर आहात. अशा कठीण काळात काम करणे सोपे नाही. परंतु तुम्ही सर्वजण जे काम करत आहात ते नक्कीच कौतुकास्पद आहे.' दरम्यान,सिद्धार्थ शुक्ला हा बालिका वधू या मालिकेमुळे घराघरात पोहोचला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. दिल से दिल तक या मालिकेतही त्याने काम केले होते. २०१४ मध्ये हम्टी शर्मा की दुल्हनिया या सिनेमातून त्याने हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. बिग बॉस १३ मधूनही सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉसच्या कार्यक्रमात पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्याची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. अलिकडेच हे दोघेजण बिग बॉस ओटीटीमध्ये दिसले होते. त्याशिवाय सिद्धार्थ शुक्ला खतरों के खिलाडीच्या सातव्या पर्वाचा विजेता होता. याशिवाय त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टँलेंट कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले होते. २००८ मध्ये सिद्धार्थने बाबुल का अंगना छूटे ना या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० मध्ये मुंबईतील हिंदू ब्राह्मण परिवारात झाला. त्याने मॉडेलिंग करत झगमगत्या विश्वात प्रवेश केला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BBdyIA