Full Width(True/False)

दोन वेळा मरणाच्या दारातून परत आला होता सिद्धार्थ शुक्ला; काय घडलं होतं तेव्हा?

मुंबई: हिंदी मालिकासृष्टीसाठी आजचा दिवस धक्कादायक ठरला. अनेक मालिकांमधून झळकलेला आणि प्रेक्षकांचा आवडता अभिनेता याचं निधन झालं. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना तसंच अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. सिद्धार्थचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयानं दिली आहे. बुधवारी रात्री त्यानं झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. त्यानंतर तो झोपेतून उठलाच नाही. झोपेतंच त्यानं अखेरचा श्वास घेतला. पण यापूर्वी दोन वेळा मरणाच्या दारातून सिद्धार्थ परत आला होता. २०१८मध्ये सिद्धार्थच्या कारला मोठा अपघात झाला होता. सिद्धार्थच्या भरधाव कार तीन गाड्यांना धडकली होती. त्यानंतर त्याची कार दुभाजकावर चढली. या अपघातात सिद्धार्थसह पाच जण गंभीर जखमी होते. तर २०१४मध्ये देखील रस्त्ये अपघातातून सिद्धार्थ बचावला होता. दरम्यान, सिद्धार्थच्या अचानक जाण्यानं अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी सिद्धार्थला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gV677a