Full Width(True/False)

मस्त ऑफर! ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा स्मार्टफोन १२ हजार रुपये स्वस्तात खरेदी करा, पाहा ऑफर

नवी दिल्लीः जर तुम्हाला दमदार फीचरचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. या डील अंतर्गत पॉवरफुल स्मार्टफोन तुम्हाला सध्याच्या किंमतीपेक्षा १२ हजार रुपये स्वस्त किंमतीत मिळू शकतो. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. कारण, ही ऑफर ७ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या Flipkart Big Billion Days सेल मध्ये मिळणार आहे. ही ऑफर वर दिली जात आहे. १२ हजार रुपये स्वस्त मिळेल आसुस ROG Phone 3 ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा Asus ROG Phone 3 सध्या आसुसच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्ट दोन्ही जागी ४६ हजार ९९९ रुपयात मिळत आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये हा स्मार्टफोन ३४ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवाती किंमतीत मिळेल. म्हणजेच, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये तुम्ही ३४ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. सध्याच्या किंमतीप्रमाणे हा स्मार्टफोन तुम्हाला १२ हजार रुपये स्वस्त किंमतीत मिळेल. फोन १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचे व्हेरियंट आता ४९ हजार ९९९ रुपयात मिळत आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजचा फोन ५४ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. Asus ROG Phone 3 ची किंमत आसुस ROG Phone 3 भारतात ४९ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवाती किंमतीत लाँच करण्यात आला होता. ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची होती. फोनचा १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा व्हेरियंट ५७ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत आला होता. Asus ROG Phone 3 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर सोबत येतो. स्मार्टफोनमध्ये ६.५९ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा Asus ROG Phone 3 च्या रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक मध्ये मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, फोनच्या बॅकमध्ये १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6,000 mAh ची बॅटरी दिली आहे. 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zAxcml