मुंबई- ९० चं दशक गाजवणारी आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी चाहत्यांच्या मनावरून तिची जादू अजूनही उतरलेली नाही. १९९१ साली 'पत्थर के फुल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रविनाने 'मोहरा', 'दिलवाले' 'अंदाज अपना-अपना' आणि 'दुल्हे राजा' यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केलं. रविनाने तिच्या अभिनयाने आणि चेहऱ्यावरील हटके हावभावांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. मुळात शांत स्वभावाच्या असणाऱ्या रविनाने रागाच्या भरात तिच्या पतीच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या अंगावर ज्युसचा ग्लास फेकला होता. त्यात तिच्या बोटाला दुखापत देखील झाली होती. रविनाने २००३ साली यांच्यासोबत विवाह केला. अनिल यांचं पहिलं लग्न नताशा सिप्पी सोबत झालं होतं. रविना नेहमीच आपल्या कुटुंबाला आयुष्यात प्रथम स्थान देत आली. नवीन वर्षाला आयोजित केलेल्या एका समारंभात नताशा अनिल यांच्या फार जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. रविना सुरुवातीला दुरून सगळं पाहत होती. शेवटी अती झाल्याने रविनाने रागात एक ज्यूसचा ग्लास नताशाच्या अंगावर फेकला. रविनाने इतक्या वेगात तो ग्लास फेकला की नताशा यांच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर रविनाने म्हटलं होतं की, जर कुणी तिच्या पतीचा किंवा तिच्या कुटुंबाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांना सोडणार नाही. घडलेल्या घटनेवर नताशा यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं, 'मी अनिल यांच्यापासून पाच फूट दूर होते. तरीही रविनाला अडचण असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही. मी दुसऱ्या कुणाच्या तरी आमंत्रणावर तिथे गेले होते. मला त्यांच्या इथे असण्याने काहीच फरक पडत नव्हता. रविनाला या गोष्टीचा राग येत असेल तर मी काय करू.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y1SJr2