Full Width(True/False)

Elon Musk यांच्या Starlink नेटवर्कसाठी 'या' भारतीय व्यक्तीची नियुक्ती, दिली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली: जगातील टॉप स्पेस फर्म ने जाहीर केले आहे की, संजय भार्गव पुढील महिन्यापासून Starlink इंडियाचे कंट्री डायरेक्टर म्हणून संघात सामील होणार असून ते १ ऑक्टोबर २०२१ पासून SpaceX सह भारतातील स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर म्हणून काम सांभाळतील.अलीकडेच, लिंक्डइन पोस्टद्वारे भार्गव यांनी ही माहिती दिली. वाचा: त्यांनी LinkedIn पोस्टमध्ये सांगितले की, देशाच्या ग्रामीण भागातून भारतामध्ये कनेक्टिव्हिटी ट्रांसफॉर्मेशनला समर्थन देण्यासाठी त्यांनी स्टारलिंकसह एक सामायिक व्हिजन शेयर केले आहे . भार्गव यांनी असेही सांगितले आहे की, त्यांनी यापूर्वीही सोबत काम केले आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला , एलन मस्कने डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेपाल आणले. त्यावेळी भार्गव सेवा संघाचे संस्थापक सदस्य होते. भार्गव २००४ पासून इतर प्रकल्पांवर काम करण्यासाठी भारतात आले असून ते आता एलन मस्कद्वारे संचालित इतर व्यवसायांमध्ये काम करतील. भारतात SpaceX ची उपग्रह ब्रॉडबँड सेवा स्टारलिंकचा विस्तार करण्याचे लक्ष्य भार्गव यांचे असेल. स्पेसएक्सची कंपनी स्टारलिंक ही जगातील अव्वल उपग्रह ब्रॉडबँड सेवेपैकी एक आहे, जी वेगाने विस्तार करत आहे. ही सेवा जगातील दुर्गम भागातही इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांच्या गटावर अवलंबून असून यापूर्वी कधीही न पाहिलेली इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचा SpaceX चा हेतू आहे. स्टारलिंक जगातील अनेक क्षेत्रांमध्ये केबलद्वारे अतिशय वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्पीड प्रदान करण्याचे आश्वासन देते. सोबतच, SpaceX भारतात उपग्रह संप्रेषण उपकरणे स्थानिक पातळीवर तयार करण्याची योजना देखील आखत आहे. यामध्ये, अँटेना प्रणाली आणि युजर्स टर्मिनल डिव्हाइससह इतर उपकरणे आहेत. कंपनी याच संदर्भात दूरसंचार विभागासह इतर महत्त्वाच्या लोकांच्या संपर्कात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3unD1CI