मुंबई- '' ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'बिग बॉस मराठी ३' ची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात सध्या अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळतेय. बिग बॉसने दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठी सदस्य जीवाचं रान करतायत. टास्क जिंकण्यासाठी काहीही, असं सदस्यांनी मनात पक्कं केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घरात सुरू असणाऱ्या टास्कमध्ये सदस्यांची खडाजंगी पाहायला मिळणार आहे. बिग बॉसने दिलेल्या हल्ला बोल या टास्कदरम्यान मीरा जग्गन्नाथ आणि यांना उलटसुलट बोलताना दिसणार आहे. त्यामुळे विकासदेखील मीराला खुलं आव्हान देणार आहे. हल्ला बोल या टास्कमध्ये मोटार सायकलवर बसलेल्या एका गटातील सदस्यांना दुसऱ्या गटातील सदस्यांनी युक्ती लढवून उठवायचे आहे. तर मोटार सायकलवर बसलेल्या सदस्यांनी काहीही झालं तरी जास्तीत जास्त वेळ त्यावर बसून राहायचे आहे. खेळाच्या सुरुवातीला सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील या मोटार सायकलवर बसतात. परंतु, विरोधी गटातील सदस्य त्यांना मोटार सायकलवरून उठवण्यात यशस्वी होतात. त्यानंतर विशाल आणि विकास मोटार सायकलवर बसतात. त्यांना उठवण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्यांचा वापर करून झाल्यावरही जेव्हा विशाल आणि विकास गाडीवरून उठत नाही तेव्हा मीरा त्यांच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करते. विशालला तुला घरात अफेअर करायचं आहे. तू अशाच मुलींसोबत अफेअर कर असं म्हणते. गायत्री देखील काही थांबायचं काही नाव घेत नाहीये. एका मागून एक काही ना काही शब्दफेक सुरू आहे. एकही शब्द कोणीच पडू देत नाहीये. विकास आणि विशाल मोटार बाईक बसल्यापासून सदस्यांची बडबड सुरू आहे. अखेर गायत्री आणि मीराच्या बोलण्याला उत्तर देत विकास म्हणतो, 'गायत्री आणि मीरा इतकं बोलतायत, मी त्यांना खुलं चॅलेंज देतो. जर त्यांच्यात दम असेल तर त्यांनी उद्या सकाळी पहिलं गाडीवर बसून दाखवावं. मग आम्ही काय करतो ते बघा.' आता मीरा खरंच विकासचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गाडीवर बसणार का, विकास आणि विशाल या टास्कमध्ये विजयी होणार का, विकास मीराला गाडीवरून उतरवायला कोणत्या युक्त्या वापरणार हे येत्या भागात कळेलच.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iiBwRt