मुंबई : बिग बॉस मराठीचा तिसरे पर्व सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झाला. आता दुसऱ्या आठवड्यामध्ये बिग बॉसने घरातील स्पर्धकांना 'हल्लाबोल' हा टास्क करायला सांगितला. या टास्कसाठी दोन टीम केल्या गेल्या. एका टीममध्ये सुरेखा, सोनाली, विशाल, विकास, मीनल,अविष्कार आणि शिवलीला आहेत. तर दुसऱ्या टीममध्ये मीरा, स्नेहा, गायत्री, जय, तृप्ती, दादूस, उत्कर्ष आणि अक्षय आहेत. बिग बॉसने टास्क सांगितल्यानंतर मोटार बाईकवर बसण्याचा निर्णय सुरेखा यांनी जाहीर केला. तिला अडवण्याचा मीनल आणि विकासने प्रयत्न केला परंतु त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर सुरेखा आणि सोनाली मोटार बाईकवर बसल्या. त्यानंतर टास्क सुरू झाला. प्रतिस्पर्धी टीममधील सदस्यांनी त्यांना बाईकवरून उतरवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. साबणाचे पाणी, अंडी फोडणे, अंगावर कचरा टाकणे इतकेच नाही तर गायत्रीने मिरचीची धुरीदेखील दिली. अखेर सुरेखा यांनी बाईकवरून उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विकास आणि विशाल मोटर बाईकवर बसायला आले. आजच्या भागामध्ये हे दोघेजण बाईकवर बसण्यात किती यशस्वी ठरतात याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. बिग बॉसने दिलेला हा टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीममधील सदस्य अनेक फंडे वापरताना दिसणार आहेत. 'हल्ला बोल' टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमचे भरपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. हा टास्क सुरू असताना अविष्कार बाईकवर बसलेल्या विकास आणि विशालला धीर देताना दिसत आहे. अविष्कार त्यांना म्हणतो 'मी खेळायला तयार आहे, परंतु आता हा खेळ तुम्हाला खेळायचा आहे.' असे म्हणत तो त्यांना प्रोत्साहन देत असतो. अविष्कारच्या या वक्तव्यावर स्नेहा अविष्कारला उद्देशून टोमणा मारते. ती म्हणते 'जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार?' आता स्नेहाच्या या टोमण्यावर अविष्कार काय उत्तर देणार आणि त्यावर त्यांच्यात वाद होणार का हे आजच्या भागात पाहावं लागेल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39KpxaK