Full Width(True/False)

६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे बेस्ट स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट

नवी दिल्लीः जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये बेस्ट ऑप्शन आहेत. या फोनची किंमत ६ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही बेस्ट ऑप्शन संबंधी माहिती देत आहोत. या लिस्टमध्ये सॅमसंग आणि नोकिया सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोन्समध्ये तुम्हाला ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि लेटेस्ट सॉफ्टवेयर सारखे फीचर्स पाहायला मिळतील. Samsung Galaxy M01 Core सॅमसंगच्या या स्मार्टफोनला गेल्या वर्षी जुलै मध्ये लाँच करण्यात आले होते. ग्राहक याला रिलायन्स डिजिटलच्या वेबसाइटवर ५ हजार १९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. या किंमतीत ग्राहकांना १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजचा फोन मिळेल. या स्मार्टफोनमध्ये ५.३ इंचाचा एचडी प्लस टीएफटी डिस्प्ले, क्वॉड कोर मीडियाटेक ६७३९ प्रोसेसर, ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळते. Karbonn X21 या स्मार्टफोनला भारतात या वर्षी जूनमध्ये लाँच करण्यात आले होते. फ्लिपकार्टवर याची किंमत ५ हजार ४९८ रुपये आहे. या किंमतीत ग्राहकांना २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर UNISOC SC9863 चिपसेट, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. Nokia C01 Plus या स्मार्टफोनला कंपनीने भारतात काही दिवसांपूर्वीच लाँच केले आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस १६ जीबी व्हेरियंटची किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहक या फोनला अमेझॉन आणि नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. नोकियाचा हा बजेट स्मार्टफोन Unisoc SC9863A प्रोसेसर, 5MP रियर कॅमेरा, 2MP सेल्फी कॅमेरा, 3,000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lMsUUd