Full Width(True/False)

स्वस्तात मस्त! Dizo Watch 2 आणि Watch Pro चा आज पहिला सेल, किंमत फक्त...

नवी दिल्ली : Dizo Watch 2 आणि ला गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आले आहे. या आजपासून खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन सेंसर आणि हार्ट रेट मॉनिटरसारखे फीचर्स दिले आहे. तसेच, प्रो मॉडेलमध्ये ९० स्पोर्ट्स मोड्स आणि बिल्ट-इन जीपीएस दिले आहे. वाचा: Realme ची किंमत २,९९९ रुपये आहे. मात्र, सुरुवातीला वॉचची विक्री १,९९९ रुपयात केली जाईल. तर Dizo Watch Pro ची किंमत ४,९९९ रुपये आहे. मात्र, तुम्ही ४,४९९ रुपयात खरेदी करू शकता. ग्राहक आजपासून या दोन्ही स्मार्टवॉचला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. Dizo Watch 2 क्लासिक ब्लॅक, गोल्डन पिंक, आइव्हरी व्हाइट आणि सिल्वर ग्रे रंगात येते. तर Dizo Watch Pro ब्लॅक आणि स्पेस ब्लू रंगात खरेदी करता येईल. Dizo Watch 2 आणि Watch Pro चे स्पेसिफिकेशन्स Dizo Watch 2 मध्ये १.६९ इंच आणि Watch Pro मध्ये १.७५ इंच डिस्प्ले दिला आहे. दोन्हीमध्ये १०० वॉच फेस दिले आहेत. वॉच मेटल फ्रेमसोबत येते. यात उजव्या बाजूला एक फिजिकल बटन देखील आहे. ही वॉच ५ मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टेंट आहे. प्रो व्हेरिएंट आयपी६८ सर्टिफाइड आहे. हेल्थ आणि फिटनेस फीचर्सबद्दल सांगायचे तर डिझो वॉच २ आणि वॉच प्रो मध्ये हार्ट रेट सेंसर, SpO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, सिडेंट्री आणि हायड्रेशन रिमाइंडर दिले आहे. डिझो वॉच २ मध्ये १५ स्पोर्ट्स मोड्स आणि वॉच प्रो मध्ये ९० स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. Pro व्हेरिएंटमध्ये बिल्ट-इन ड्यूल सेटेलाइट जीपीएस आहे. म्हणजेच, स्मार्टफोनशिवाय आउटडोर अ‍ॅक्टिव्हिटीज ट्रॅक करू शकता. Dizo Watch 2 आणि Watch Pro मध्ये म्यूझिक कंट्रोल, वेदर अपडेट्स, सोशल नॉटिफिकेशन आणि कॅमेरा कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत. Dizo Watch 2 मध्ये २६० एमएएच आणि वॉच प्रो मध्ये ३९० एमएएच बॅटरी दिली आहे. दोन्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट मिळते. वॉच अँड्राइड आणि आयओएस कंपॅटिबल आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XCQomc