Full Width(True/False)

२ सेल्फी कॅमेरे आणि फास्ट चार्जिंगसह ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन लाँच, फक्त २० मिनिटात होणार फुल चार्ज

नवी दिल्ली : ने चीनमध्ये Nova 9 सीरिजचे लाँच केले आहे. ही सीरिज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेट आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या सीरिज अंतर्गत आणि या स्मार्टफोनला लाँच केले आहे. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Nova 9 आणि Nova 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स Nova 9 मध्ये ६.५७ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २३४०x१०८० पिक्सल आहे. तर नोवा ९ प्रो मध्ये ६.७२ इंचाचा डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिझॉल्यूशन २६७६x१२३६ पिक्सल आहे. दोन्ही डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, ३०० हर्ट्ज टच सँपलिंग रेट आणि पी३ कलर गेमटसह ओलेड पॅनेल कर्व्डसह येतात. नोवा ९ मध्ये सिंगल कॅमेऱ्यासाठी पंच होल आहे. तर प्रो मॉडेलमध्ये दोन कॅमेऱ्यासाठी एक मोठा कट-आउट दिला आहे. नोवा ९ मध्ये स्नॅपड्रॅगन ७७८ प्रोसेसर आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८/२५६ जीबी स्टोरेज दिले आहे. तसेच ५ जी कनेक्टिव्हिटीऐवजी ४जी सपोर्ट मिळेल. Nova 9 आणि Nova 9 Pro ची बॅटरी नोवा ९ मध्ये ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४३००एमएएचची बॅटरी आणि नोवा ९ प्रो मध्ये १०० वॉट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की प्रो मॉडेल फक्त २० मिनिटात फुल चार्ज होईल. Nova 9 आणि Nova 9 Pro चे अन्य फीचर्स दोन्ही फोनमध्ये एलडीएसी सपोर्टसह ब्लूटूथ ५.२, पेमेंट सपोर्टसह एनएफसी, ड्यूल बँड वाय-फाय, ड्यूल सिम सपोर्ट, एनएव्हीआयसी सपोर्टसह ड्यूल फ्रीक्वेंसी जीपीएस आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. दोन्ही फोन HarmonyOS 2 वर काम करतात. Nova 9 आणि Nova 9 Pro चा कॅमेरा नोवा ९ प्रो मध्ये दोन ३२ मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. एक सेंसर एफ/२.४ अपर्चरसह येणारा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, दुसरा एफ/२.० पोर्ट्रे कॅमेरा आहे. नोवा ९ मध्ये एक ३२ मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. नोवा ९ आणि नोवा ९ प्रो मध्ये रियरला ४ कॅमेरे दिले आहेत. यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सल ऑफ फील्ड कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. Nova 9 आणि Nova 9 Pro ची किंमत नोवा ९ च्या ८ जीबी +१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३१८ डॉलर्स (जवळपास ३०,८६८ रुपये) आहे. ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ४६४ डॉलर्स (३४,२६५ रुपये) आहे. नोवा ९ प्रो च्या ८ + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ५४२ डॉलर्स (जवळपास ४०,०२५ रुपये) आहे. तर ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ६०४ डॉलर्स (जवळपास ४४,६०३ रुपये) आहे. दोन्ही फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. २९ सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZwKuEt