Full Width(True/False)

Poco च्या 'C' सीरीजचा स्वस्त फोन ३० सप्टेंबरला येतोय, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी ३० सप्टेंबरला भारतात आपल्या नवीन 'C' सीरीजचा फोन लाँच करणार आहे. कारण, कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर सी यू यून असा उल्लेख करीत एक टीझर इमेज शेयर केली आहे. कंपनीने अजून पर्यंत अपकमिंग स्मार्टफोन संबंधी कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, या फोनला चे नाव दिले जाणार आहे. नवीन फोन चा सक्सेसर असणार आहे. कंपनीने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये याला लाँच केले होते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पोकोने लाँच केल्यानंतर देशात C3 स्मार्टफोनची २० लाखांहून जास्त युनिट्सची विक्री केली होती. शाओमी स्पिन ऑफ ब्रँड Poco च्या एका नवीन डिव्हाइस संबंधी सर्वात आधी फ्लिपकार्टवर लिस्टिंगवरून माहिती समोर आली होती. फ्लिपकार्टवरून बिग बिलियन डेज सेल दरम्यान, प्रोडक्ट्सचे एक सीरीज लाँच करण्यात आली होती. पोको डिव्हाइसचे टीजर आधीच या यादीत पाहायला मिळत होते. C4 च्या Redmi 10 समान असण्याची शक्यता आहे. कारण, कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन C3 Redmi 9 समान होता. Poco C3 स्मार्टफोन मध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 SoC मिळतो. हा 10W चार्जिंग सोबत 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. यावर्षी Poco C3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत सद्या ७ हजार ३४९ रुपये आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ३४८ रुपये आहे. स्मार्टफोनचे स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kBj20c