Full Width(True/False)

आता ट्विटरवरून कमवा पैसे, आले ‘हे’ जबरदस्त फीचर

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले फीचर लाँच केले आहे. या फीचरद्वारे यूजर्स सबस्क्राइबर ओनली कॉन्टेंटसाठी पैसे घेऊ शकतात. या फीचरला कंपनीकडून रोल आउट करण्यात आले असून, कंपनी यूजर्सला पैसे कमवण्याची संधी देत आहे. वाचा: Super Follows फीचर अ‍ॅक्सेसला मर्यादित ठेवण्यात आले आहे. सर्वांनाच हे फीचर वापरता येणार नाही. हे फीचर वापरण्यासाठी कमीत कमी १० हजार फॉलोअर्स असणे गरजेचे आहे. यात यूजर्स २.९९ डॉलर, ४.९९ डॉलर आणि ९.९९ डॉलर सबस्क्रिप्शन चार्ज सेट करू शकतात. फीचर वापरण्यासाठी गेल्या ३० दिवसात कमीत कमी २५ ट्विट केलेले असणे गरजेचे आहे. सध्या हे फीचर अमेरिका आणि कॅनडामधील आयओएस यूजर्ससाठीच उपलब्ध करण्यात आले आहे. याद्वारे सबस्क्राइब्ड यूजर्स एक्सक्लूसिव्ह कॉन्टेंट पाहू शकतील. या फीचरसाठी अ‍ॅप्लाय करण्यासाठी iOS अ‍ॅपवर मेन्यू ओपनमध्ये जावे लागेल. यात सर्वात खाली मॉनिटाइझेशनचा पर्याय दिसेल. त्यानंतर सुपर फॉलोचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. येथे तुम्हाला एलिजिबिलिटी चेक करावी लागेल. तुम्ही जर फीचरसाठी क्वालिफाय असल्यास अ‍ॅप्लाय बटनवर क्लिक करा. येथे तुम्हाला व्हेरिफाय करावे लागेल की तुमचे १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पूर्ण भरून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करावे लागेल. आता तुम्हाला कॉन्टेंट कॅटेगरी जसे की आर्ट, कॉमेडी निवडावे लागेल. फॉर्म भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अप्रूव्हलसाठी किती वाट पाहावी लागेल हे अद्याप स्पष्ट नाही. हे फीचर लवकरच इतर देशांमध्ये देखील जारी केले जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DQ4cuu