Full Width(True/False)

भन्नाट! हा हटके Air Purifier चक्क झाडांच्या मदतीने करेल घरातील हवा शुद्ध

नवी दिल्ली : वाढत्या वायू प्रदुषणामुळे घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील नवनवीन प्यूरीफायर आणत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच स्मार्ट एअर प्यूरीफायरची माहिती देणार आहोत, जे हवा स्वच्छ करण्यांसाठी झाडाचा उपयोग करते. वाचा: IIT रोपरची स्टार्टअप कंपनी अर्बन एअर लेबोरेटरीने एक असे स्मार्ट एअर प्यूरीफायर तयार केले आहे, जे तुमच्या घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी झाडाचा उपयाग करते. Plant : कसे काम करते? हे एअर प्यूरीफायर झाड आणि मातीचा उपयोग ‘स्मार्ट बायो-फिल्टर; स्वरुपात करते. या एअर प्यूरीफायरचा उपयोग केल्यावर तुमच्या घरातील हवा soil-root zone मध्ये जाते. Phytoremediation नावाच्या प्रक्रियेद्वारे हवेतील प्रदुषण कमी होते. या प्रक्रियेद्वारे झाडं हवेतील दुषित कण कमी करतात. या झाडांचा होतो वापर ज्या विशिष्ट झाडांचे परीक्षण एअर प्यूरिफिकेशनसाठी करण्यात आले, त्यामध्ये पीस लिली, स्नेक प्लांट, स्पाइडर प्लांट इत्यादीचा समावेश आहे. याला यूब्रीथ लाइफ स्वरुपात डब केले जाते. स्टार्टअप कंपनीचा दावा आहे की, ही विशिष्ट झाडं प्रभावीपणे कण, वायू आणि जैविक दूषित घटकांना हटवून घरातील हवा शुद्ध करते. यामुळे ऑक्सिजनच्या स्तरात देखील वाढ होते. फ्लिटर लाकडाच्या बॉक्समध्ये लावले जाते. यात एक centrifugal fan असतो, जो प्यूरीफायरच्या आत सक्शन प्रेशर निर्माण करतो आणि ३६० डिग्री दिशेत आउटलेटच्या माध्यमातून मुळांमधील शुद्ध हवा बाहेर सोडते. या प्रोडक्टमुळे संज्ञानात्मक कार्य, शारीरिक आरोग्य आणि मानसिक फायदे होत असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. झाडांना रोज पाणी देण्याचीही गरज नाही यूजर्सला संयंत्राला नियमित पाणी देण्याची देखील गरज नाही. कारण यात १५०ml पाणी साठा क्षमता देण्यात आली आहे, जे झाडांच्या गरजेसाठी बफर स्वरुपात काम करते. झाड सुकतात त्यावेळी हे उपकरण आपोआप झाडांना पाण्याचा पुरवठा करते. हे तंत्रज्ञान आयआयटी, रोपर आणि कानपूरच्या वैज्ञानिकांनी व दिल्ली विद्यापीठाच्या मॅनेजमेंटच्या फॅक्लटीने तयार केले आहे. या इयर प्यूरीफायरचा वापर हॉस्पिटल, शाळा, ऑफिस आणि घरात करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zQmJnK