Full Width(True/False)

एअरपोर्ट लुकवरून युझर्सने केलं सलमान खानला ट्रोल, म्हणाले-

मुंबई- बॉलिवूडमधील कलाकार आधीच्या तुलनेत सोशल मीडियामुळे जास्त चर्चेत असतात. जिथे जिथे कलाकार जातात तिथे तिथे फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढायला जातात. मग ते जिम असो, हॉटेल असो वा विमानतळ. त्यांचे फोटो काढले जातात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. आपल्या लाडक्या कलाकारांच्या या फोटोंवर त्यांचे चाहते भरभरून लाइक्स आणि कमेन्ट करत असतात. अनेकदा त्यांच्या या फोटोंमुळे त्यांना ट्रोलही केले जाते. अलिकडेच बॉलिवूडचा दबंग खान अर्थात ला सोशल मीडियावर युझर्सने ट्रोल केले आहे. टायगर ३ सिनेमाच्या चित्रीकरणावरून मुंबईला परतलेल्या सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमधील सलमानला पाहून युझर्सने त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. कशामुळे झाला सलमान ट्रोल रिअॅलिटी शो चे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. हा कार्यक्रम ३ ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमासाठी म्हणून सलमान त्याचे टायगर ३ या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण करून मुंबईला परतला. मुंबई विमानतळावर तो आला तेव्हा तिथे असलेल्या फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढले. हे फोटो क्षणार्धात व्हायरलही झाले. ते फोटो पाहून अनेक युझर्सने सलमानला ट्रोल करायला सुरुवात केली. या फोटोंमध्ये सलमान कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. त्याने जीन्स आणि काळा टीशर्ट घातला होता. तसेच त्याने मास्कही लावला होता. त्या मास्कवर एसके असे लिहिले होते. परंतु या फोटोमध्ये सलमानने केलेली एक चूक युझर्सच्या लक्षात आली आणि त्यांनी सलमानला ट्रोल करायला सुरुवात केले. सलमानने त्याचा मास्क उलटा लावला होता. त्यावरून युझर्सने त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, 'आधी तू मास्क सरळ लावायला शिक केएस.' तर आणखी एका युझरने लिहिले की, 'कधीही मास्क न वापरणारी व्यक्ती जेव्हा मास्क वापरते तेव्हा असेच होते. सलमानने लावलेला उलटा मास्क हे त्याचे प्रतिक आहे.' असे असले तरी अनेक युझर्सना सलमानचा हा अंदाज आवडला आहे. त्यांनी सलमानवर भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान, सलमान खान आता बिग बॉस १५ मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे नखरे यामुळे गाजतो. तसेच सलमानच्या सूत्रसंचलनामुळेही हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडतो. बिग बॉसच्या १५ व्या पर्वामध्ये शमिता शेट्टी, करण कुंद्रा, डोनल बिष्ट, उमर रियाज हे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे नक्की झाले आहे. त्याशिवाय या कार्यक्रमात आणखी कोण स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत, याची माहिती २ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणाऱ्या प्रिमिअर शोमध्ये समजणार आहे. यंदा बिग बॉस कार्यक्रमाची थीम जंगल अशी आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक कठीण गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. आता या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. सलमानच्या कामाच्या बाबत सांगायचे तर अलिकडेच त्याचा 'राधे युअर मोस्ट वाँटेड भाई' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा चाहत्यांना फारसा रुचला नाही, त्यामुळे त्यांनी सलमानवर टीका केली होती. आता सलमान आणि कतरिना कैफ 'टायगर ३' चे चित्रीकरण करत आहेत. याशिवाय सलमान 'अंतिम द फायनल ट्रूथ' आणि 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमांत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oi2nRu