मुंबई- ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री यांनी नुकतेच बॉलिवूडमध्ये आपली ५० वर्ष पूर्ण केली. या निमित्ताने त्यांचा मुलगा ने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करताना अभिषेकने आई जया यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, 'मी त्यांचा मुलगा आहे, त्याबद्दल मी अभिमानी आहे. सिनेसृष्टीत त्यांना ५० वर्ष पाहण्याचा योग ही एक अभिमानास्पद बाब आहे. सिनेक्षेत्रातील ५० वर्षपूर्तीच्या आई तुला शुभेच्छा, आय लव्ह यू.' अभिषेकच्या या पोस्टवर जया यांची नात हिने कमेंट करत लिहिले, 'हे प्रेम आहे.' यासोबतच बॉबी देओल, अनिल कपूर, चित्रांगदा सिंग यांच्यासह असंख्य सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले. अभिषेक व श्वेताच्या जन्मानंतर कमी केले काम अभिषेकचे आई-वडील अर्थात बॉलिवूडचे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी जून १९७३ मध्ये लग्न केले होते. या दोघांनी जंजीर, शोले, अभिमान, मिली, चुपके चुपके व सिलसिला यांसारख्या चित्रपटांमध्ये सोबत काम केले. त्यानंतर श्वेता बच्चन नंदा व अभिषेक बच्चन यांच्या जन्मानंतर जया बच्चन थोड्याच चित्रपटांमध्ये दिसून आल्या. २०१६ मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात बिग बी व जया बच्चन पुन्हा एकत्र दिसून आले होते. या चित्रपटात अभिषेकने आईसोबत साकारली भूमिका तर अभिषेकने २००२ मध्ये बंगाली चित्रपट 'देश' मध्ये आपल्या आईसोबत एकत्र भूमिका साकारली होती. यासोबतच अभिषेक लवरकरच बॉब बिस्वासवर आधारित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट कंपनीमार्फत करण्यात येत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XYcqjs