Full Width(True/False)

Facebook, Twitter आणि WhatsApp ला टक्कर देताहेत हे 'मेड इन इंडिया' अॅप, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः भारतात २०२० मध्ये चीनी मोबाइल अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या संख्येत भारतीय मोबाइल अॅप लाँच करण्यात आले आहे. याचा चांगलाच वापर होत आहे. नुकताच फेसबुकला टक्कर देण्यासाठी मेड इन इंडिया मोबाइल अॅप Bharatam लाँच करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या काही निवडक भारतीय अॅपची माहिती देत आहोत. हे अॅप Facebook, Twitter आणि WhatsApp ला पर्याय ठरू शकले आहेत, जाणून घ्या डिटेल्स. Bharatam भारतम अॅपला फेसबुकच्या टक्कर मध्ये लाँच करण्यात आले आहे. या अॅपमध्ये ट्रेंडिंग हॅशटॅग पाहिले जावू शकते. सोबत या अॅप मध्ये तुमच्या हिशोबाप्रमाणे पोस्ट शेयर करू शकता. याशिवाय, अॅपमध्ये एक्सप्लोर, पॉप्यूलर पोस्ट सारखे फीचर्स मिळतील. भारतम अॅपचे मुख्य फीचर म्हणजे यात लोकेशननुसार मित्र बनवण्याची सुविधा देण्यात आली आहे. Koo सध्या कू मोबाइल अॅप मध्ये लाखो युजर्स जोडले आहे. यात नेता पासून अभिनेत्या पर्यंतचा समावेश आहे. या अॅपमध्ये युजर्सं ट्विटरच्या प्रमाणे ट्विट करू शकतात. या अॅपला गुगल प्ले स्टोरेवर ४.६ गुणाची रेटिंग मिळाली आहे. याची साइज २३ एमबी आहे. Sandes संदेस अॅपची साइज ३१ एमबी इतकी आहे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरवर ४.३ गुणाची रेटिंग मिळाली आहे. संदेस अॅप व्हाट्सअॅप प्रमाणे आहे. यात एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन, कॉन्टॅक्ट शेयरिंग, मेसेज स्टाइलिंग, ग्रुप चॅटिंग, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंग सारखे फीचर मिळतील. FAU-G कॉल ऑफ ड्यूटी आणि बीजीएमआय गेम ला FAU-G गेमकडून जोरदार टक्कर मिळत आहे. फौजी गेम अँड्रॉयड ८ आणि यावरच्या व्हर्जनवर काम करीत आहे. यात तुम्हाला सिंगल प्लेयर वरून डेथमॅच सारखे मोड मिळतील. हा गेम गलवान खोऱ्याच्या जंगलावर आधारित आहे. या गेमची साइज १२४ एमबी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39B1B9F