लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. पण , कमी बजेटमुळे जर जुनाच फोन वापरावा लागत असेल. तर, आता तुमचे टेन्शन संपलेच म्हणून समजा. अगदी कमी किमतीत तुम्ही आता तुमचा फोन अपग्रेड करू शकणार आहात. यासाठी तुमची मदत करणार फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल. हा सेल ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून १० ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला या सेलचा लाभ घेता येईल. या दरम्यान, तुम्ही मोठ्या सवलतीसह अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता . फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये बँकिंग, कॅशबॅक सारख्या सूट ऑफरचा देखील समावेश आहे. आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट डील घेऊन आलो आहोत. ज्यावर फ्लिपकार्टमध्ये स्मार्टफोनवर सर्वाधिक सवलत मिळत आहे. जाणून घ्या या स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर. आणि ठरवा तुमच्या बजेटमध्ये यापैकी नेमका स्मार्टफोन येतो ते. पाहा लिस्ट.

Realme GT 5G
किंमत - ३५,९९९ रुपये
डिस्काउंट -५,००० रुपये
Realme GT स्मार्टफोनमध्ये ६. ४३ इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये अॅड्रेनो 660 GPU सह स्नॅपड्रॅगन ८८८ 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ६४ MP सोनी IMX682 प्राथमिक सेन्सर आहे. दुसरा ८ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे आणि तिसरा २ MP मॅक्रो लेन्स आहे. याशिवाय, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये १६ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. Realme GT मध्ये ४,५०० mAh ची बॅटरी आहे, जी ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Moto G 60
किंमत - १५,००० रुपये
डिस्काउंट- ६,००० रुपये
हा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ वर आधारित स्टॉक अँड्रॉइडवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंच FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला १०८ MP प्राथमिक सेन्सर, दुसरा ८ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा २ MP डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फीसाठी समोर ३२ MP कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G60 स्मार्टफोनमध्ये ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी २० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy F 62
किंमत - १७,९९९ रुपये
डिस्काउंट १२,००० रुपये
स्मार्टफोन ६.७ इंच एस-अमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल आहे. तसेच यामध्ये Exynos 9825 प्रोसेसर देण्यात आला आहे. गॅलेक्सी एफ ६२ मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये पहिला ६४ एमपी प्राथमिक सेन्सर, दुसरा १२ एमपी अल्ट्रा वाइड सेन्सर, तिसरा ५ एमपी मॅक्रो लेन्स आणि चौथा ५ एमपी डेप्थ सेन्सर आहे. यासोबत फोनच्या समोर ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ७००० mAh ची बॅटरी आहे, जी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme X7 Pro
८ GB+१२८ GB - २७,९९९ रुपये
डिस्काउंट- ५,००० रुपये
Realme X7 Pro मध्ये ६.५ इंच फुल HD प्लस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. Realme X7 Pro 5G क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. याशिवाय, ८ एमपी वाइड अँगल लेन्स, २ एमपी रेट्रो पोर्ट्रेट लेन्स आणि २ एमपी मॅक्रो लेन्स दिले जातील. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनला ४५०० mAh ची मजबूत बॅटरी मिळेल, जी ६५ W अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंगने चार्ज केली जाऊ शकते.
Google Pixel 4a
६ GB+१२८ GB - २६,९९९ रुपये
डिस्काउंट - ६००० रुपये
Google Pixel 4A स्मार्टफोनमध्ये ५.८१ -इंच फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८०/२३५० पिक्सेल आहे. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G Soc सह येईल. जर आपण कॅमेराबद्दल बोललो तर Google Pixel 4 A च्या मागील बाजूस १२ एमपी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ८ एमपी कॅमेरा सेन्सर वापरण्यात आला आहे. गुगल पिक्सेल 4 ए स्मार्टफोनमध्ये ३,१४० mAh ची बॅटरी आहे, जी १८ W च्या मदतीने जलद चार्ज होऊ शकते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3imwy6l