नवी दिल्ली: Vivo ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo X70 Pro Plus 5G भारतात लाँच केला असून फोनमध्ये लेटेस्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. Vivo X70 Pro Plus 5G हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो उत्तम कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. ड्युअल चिपसेट Vivo V1 आणि स्नॅपड्रॅगन 888+ 5G चिपसेटसह येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. Vivo X70 Pro + 5G स्मार्टफोन एनिग्मा ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो. फोनमध्ये ड्युअल 5G सिम कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून फोन २ GB च्या विस्तारित रॅमला सपोर्ट करतो. वाचा: Vivo X70 Pro Plus किंमत आणि ऑफर : Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनच्या १२ GB RAM २५६ GB स्टोरेजची किंमत ७९,९९० रुपये आहे. त्याची प्री-बुकिंग ३० सप्टेंबर, म्हणजेच आजपासून सुरू होत असून फोनची विक्री १२ ऑक्टोबरपासून सुरू होईल. ५० W फ्लॅश चार्जरसाठी ग्राहकांना स्वतंत्रपणे ४,४९९ रुपये द्यावे लागतील. हा फोन विवो इंडिया ई-स्टोअर्स, फ्लिपकार्ट आणि ऑफ-लाइन पार्टनर रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये ६, ७८ -इंच WQHD + AMOLED डिस्प्ले आहे. फोन १२० Hz रिफ्रेश रेटसह येतो. तर, टच सॅम्पल दर ३०० Hz वर दिला जातो. यात वक्र प्रदर्शन असून १५०० निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. फोन ५ nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८८८+ 5G चिपसेट सपोर्टसह येईल. तसेच, हा फोन अँड्रॉईड ११ आधारित फनटच ओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. Vivo X70 Pro Plus : कॅमेरा फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० MP अल्ट्रा फोटो सेन्सरी सेन्सर आहे. ४८ MP अल्ट्रा वाइड गिंबल सेन्सर आणि १२MP IMX663 कॅमेरा आणि ८MP लेन्स देण्यात आले असून सुपर मून, सुपर नाईट मोडसह विविध मोड देखील देण्यात आले आहेत. याशिवाय, फोनमध्ये ६० x चा झूम, सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo X70 Pro Plus : बॅटरी पॉवर बॅकअपसाठी Vivo X70 Pro plus स्मार्टफोनमध्ये ४५०० mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती ५५ W फ्लॅश चार्जरच्या मदतीने चार्ज करण्यात सक्षम असेल. तसेच, ५० W वायरलेस फ्लॅश चार्जर समर्थित असेल. Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये IP68 रेटिंगसह गिम्बर स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान वापरले गेले आहे. तसेच, यात प्लास्टिकच्या ऐवजी काचेच्या लेन्सचा वापर करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AVPxvT