Full Width(True/False)

मस्तच! Flipkart सेलचा होणार धमाका, १५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह मिळतील ‘हे’ स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : Big Billion Days Sale लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डील्सचा लाभ घेता येईल. सेलमध्ये नवीन लाँच झालेल्या फोनवर देखील डिस्काउंट मिळेल. याशिवाय बाजारात उपलब्ध अनेक लोकप्रिय फोन्सवर ऑफर्स मिळतील. सेलमध्ये , , , आणि वर डिस्काउंट मिळेल. वाचा: Poco X3 Pro ची किंमत पोकोच्या या स्मार्टफोनला वर्षाच्या सुरुवातीला १८,९९९ रुपयात सादर करण्यात आले होते. मात्र, आता सेलमध्ये फोन १६,९९९ रुपयात उपलब्ध असेल. ही फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. म्हणजेच, २ हजार रुपये डिस्काउंटसह बँक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. Moto Edge Fusion 20 ची किंमत या फोनला २१,४९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. मात्र, आता Flipkart मध्ये फोन फक्त १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनवर १५०० रुपये डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय बँक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. Asus ROG Phone 3 ची किंमत ४९,९९९ रुपयात लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Flipkart Sale मघ्ये ३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. म्हणजेच, फोनच्या खरेदीवर तब्बल १५ हजार रुपयांची बचत होईल. याशिवाय बँक ऑफर्स देखील मिळत आहे. Google Pixel 4a ची किंमत सेलमध्ये Google Pixel 4a स्मार्टफोनवर देखील बंपर डिस्काउंट मिळणार आहे. मात्र, सेलमध्ये फोनची किंमत किती असेल, याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EFgR3w