Full Width(True/False)

जबरदस्त फीचर्ससह लाँच झाली Fossil Gen 6 स्मार्टवॉच, घड्याळावरून करता येईल कॉल

नवी दिल्ली : Gen 6 २०२१ लाइनअपला कंपनीने लाँच केले आहे. वेगवेगळ्या स्टाइल्स आणि साइजमध्ये ही वॉच लाँच करण्यात आली असून, यात एक मायकल कोर्स ब्रँडेड व्हेरिएंट देखील आहे. नवीन स्मार्टवॉच जुन्या वेअर ओएस २ सॉफ्टवेअरवर काम करते. कंपनीने २०२२ मध्ये वेअर ओएस ३ अपडेट देणार असल्याचे म्हटले आहे. नवीन वॉच ४२एमएम आणि ४४एमएम डायल साइजमध्ये येते व क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१००+ प्लॅटफॉर्मवर काम करते. वाचा: Fossil Gen 6 : किंमत आणि सेल नवीन Fossil Gen 6 रेंजची किंमत २९९ डॉलर्स (जवळपास २१,९०० रुपये) आहे. स्टेनलेस स्टील मॉडेलची किंमत ३१९ डॉलर्स (जवळपास २३,३०० रुपये) आहे. अमेरिकेत याचे प्री-ऑर्डर सुरु झाले असून, २७ सप्टेंबरपासून विक्री सुरु होईल. वॉच स्मोक स्टेनलेस स्टील, ब्राउन लेदर, ग्रीन केमो ग्रोसग्रेन आणि गोल्ड/पर्पल पर्यायासह येते. यूएस साइटवर सिलिकॉन, लेदर आणि स्टेनलेस स्टील बँडचा देखील पर्याय उपलब्ध आहे. याची किंमत २९ ते ४९ डॉलर्स (जवळपास २,००० ते ३,५०० रुपये) आहे. वॉच जागतिक बाजारात कधी लाँच होईल याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. Fossil Gen 6 Smartwatch: स्पेसिफिकेशन्स Fossil Gen 6 मध्ये ४२एमएम आणि ४४एमएम साइजमध्ये एक गोलाकार डायल आहे. यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. स्मार्टवॉचमध्ये ३२६ppi डिस्प्लेसह १.२८ इंच (४१६x४१६ पिक्सल) कलर एमोलेड टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल. वॉच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१००+ प्लॅटफॉर्मसह येते. यामुळे अ‍ॅप फास्ट लोड होतात. तसेच विजेचा वापर देखील कमी होतो. यामध्ये ब्लूटूथ वी५ कनेक्टिव्हिटी सपोर्ट मिळेल. याच्या मदतीने कॉलवर बोलता येईल, यासाठी एक स्पीकरफोन आणि माइक देखील देण्यात आला आहे. वॉच ३० मिनिटात ८० टक्के चार्ज होईल. बॅटरी लाइफ एक्सटेंडेड मोडमध्ये २४ तास टिकेल. ब्लड ऑक्सिजन मोजण्यासाठी यात एक इंटिग्रेटेड SpO२ सेंसर दिले आहे. हर्टरेट मॉनिटरिंग आणि बिल्ट-इन वेलनेस अ‍ॅपद्वारे देखील अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकता. याद्वारे प्रोग्रेस मॉनिटर करू शकता. वॉच २ वर काम करते व यात गुगल असिस्टेंट सपोर्ट मिळेल. नवीन वॉच ३एटीएम वॉटर रेसिस्टेंट आहे. अन्य फीचर्समध्ये सोशल वॉच फेस, कॅलेंडर अलर्ट, स्मार्टफोन नॉटिफिकेशन, स्मार्ट होम डिव्हाइस कंट्रोल आणि बरचं काही मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस, एनएफसी एसई आणि वाय-फाय सपोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zyzHXb