Full Width(True/False)

दमदार बॅटरी आणि जबरदस्त डिस्प्ले सोबत येतोय itel चा नवा स्मार्टफोन

नवी दिल्लीः आयटेल (itel) ने यावर्षी भारतात अनेक स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहे. आता भारतात एक नवीन स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. लीक झालेल्या माहितीवरून नवीन स्मार्टफोन मोठ्या बॅटरी सोबत येणार आहे. नवीन फोन, आतापर्यंत सर्वात मोठ्या बॅटरीचा itel स्मार्टफोन असणार आहे. आयटेलचा नवीन स्मार्टफोन कंपनीचा स्वस्त प्रीमियम सेगमेंट Vision Series अंतर्गत येवू शकतो. हाय-कॅपेसिटी बॅटरी आणि वॉटरड्रॉप डिस्प्ले सोबत येईल itel चा नवीन स्मार्टफोन हाय कॅपिसिटी बॅटरी आणि वॉटड्रॉप डिस्प्ले सोबत येईल. या स्मार्टफोनमध्ये कर्व्ड एज डिझाइन दिली आहे. परंतु, या स्मार्टफोनचे डिटेल्स स्पेसिफिकेशन अद्याप समोर आले नाही. लीक झालेल्या माहितीनुसार, हा बजेट स्मार्टफोन असेल. या स्मार्टफोनद्वारे कंपनी त्या युजर्संना लक्ष्य करणार आहे. ज्यांना मोठी बॅटरी आणि चांगला स्मार्टफोन हवा आहे. ८ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सोबत येऊ शकतो फोन itel चा नवीन स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सोबत येवू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट मध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. याशिवाय, आयटेलच्या या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सारखे सिक्योरिटी फीचर्स दिले जावू शकते. हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम सोबत येऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले जावू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kBTTRQ