Full Width(True/False)

'या' स्मार्टफोनमध्ये मिळतेय २५६ GB स्टोरेज ते सुद्धा बजेट किमतीत, पाहा फीचर्स-किंमत

नवी दिल्ली : आता तुम्हाला २५६ GB स्टोरेजने सुसज्ज स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खिशाला कात्री लावण्याची गरज नसून अगदी कमी किमतीत तुम्ही हा फोन खरेदी करू शकणार आहात. आज आम्ही तुम्हाला आज अशा फोनबद्दल सांगणार आहो जो कमी किमतीत जबरदस्त स्टोरेज देतो. पाहा डिटेल्स. वाचा: डिस्प्ले : या Infinix मोबाईलमध्ये ६.९५ इंच (२४६०× १०८० पिक्सेल) फुलएचडी + एलसीडी स्क्रीन आहे, त्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे आणि टच सॅम्पलिंग रेट १८० हर्ट्ज आहे. Infinix Note 10 Pro कॅमेरा: या इनफिनिक्स स्मार्टफोनच्या मागील पॅनेलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह चार मागील कॅमेरे देण्यात आले आहेत, ६४ एमपी प्रायमरी,८ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा, २ एमपी ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा आणि २ एमपी पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर आणि सेल्फीसाठी १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक हेलिओ जी ९५ ऑक्टा-कोर प्रोसेसर ग्राफिक्ससाठी माली-जी ७६ जीपीयू आणि ८ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज २ TB पर्यंत वाढवणे शक्य आहे. Infinix Note 10 Proकनेक्टिव्हिटी: फोनमधील ग्राहकांना सिनेमॅटिक ड्युअल स्पीकर्स, ३.५ मिमी ऑडिओ जॅक, ड्युअल 4G VoLTE, FM रेडिओ, वाय-फाय ८०२.११ ac, ब्लूटूथ 5, GPS, GLONASS आणि USB Type-C सपोर्ट असून सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल. Infinix Note 10 Pro ची भारतातील किंमत: ग्राहक या Infinix मोबाईल फोनचे ८ GB RAM / २५६ GB स्टोरेज व्हेरिएंट १६,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. Infinix Note 10 Pro ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असून फोनमध्ये ७ डिग्री पर्पल, ९५ डिग्री ब्लॅक आणि नॉर्डिक सिक्रेट कलर हे तीन रंग पर्याय आहेत. या मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme 8, Realme 8 5G, Vivo Y51A आणि Realme 7 Pro सारखे अनेक स्मार्टफोन आहेत. पण तुम्हाला त्या सर्वांमध्ये १२८GB स्टोरेज मिळेल. परंतु कोणताही फोन या किंमत श्रेणीमध्ये २५६ जीबी स्टोरेज देत नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tVrwlP