Full Width(True/False)

Google Map वरून बुक करा Covid-19 Vaccination Slot, करावे लागेल हे सोप्पे काम, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: करोनाने आतापर्यंत कित्येकांचा बळी घेतला. अशात स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे असल्यास त्यावर लसीकरण हा एकाच उपाय आहे. हीच लसीकरणाची व्यवस्था अधिक सहज आणि सोप्पी करण्यासाठी सरकारने कोविन अॅप तयार केले, ज्यावर लसीकरणाच्या उपलब्धतेविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. आता हीच माहिती कोविन अॅप डाऊनलोड न करता देखील गुगलद्वारे सहजपणे तुम्ही मिळवू शकता. पाहा डिटेल्स. वाचा: लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती वर मिळवा या वर्षी मार्चमध्ये Google ने देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी हातमिळवणी केली आणि तेव्हापासून Google वरील युजर्सना कोविडच्या लसीकरण केंद्रांशी संबंधित सर्व माहिती मिळत आहे. आता या आठवड्यापासून युजर्सना देशातील सुमारे १३,०० लसीकरण केंद्रांवरील लस उपलब्धता आणि भेटीची सर्व माहिती Google सर्च, गुगल मॅप्स आणि गूगल असिस्टंटवर मिळणार असल्याचे गुगलतर्फे सांगण्यात आले. Google नुसार ही माहिती कोविन एपीआयच्या रिअल-टाइम डेटाद्वारे गोळा केली जाईल. यामध्ये, युजर्सना लसीकरणाशी संबंधित सर्व समस्यांची माहिती मिळेल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर किती अपॉइंटमेंट स्लॉट उपलब्ध आहेत, कोणती लस केव्हा उपलब्ध असेल, कोणत्या डोससाठी तुम्ही तिथे जाऊ शकता, लसीची किंमत यासारखी माहिती मिळेल. माहिती मिळवण्यासाठी काय करावे लागेल ? युजर्सने गुगलवर 'Vaccination Centers Near Me ' किंवा त्यांच्या सभोवतालचे क्षेत्र प्रविष्ट करून सर्च करताच लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती त्यांच्या फोन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसेल. युजर्स ही सर्व माहिती इंग्रजीमध्ये तसेच मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड या आठ इतर भारतीय भाषांमध्ये शोधू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ६५.४१ कोटी डोस देण्यात आले असून ही लसीकरण मोहीम अजूनही सुरू आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gUyp1z