Full Width(True/False)

Microsoft चा धमाका, लाँच केला दमदार फोल्डेबल स्मार्टफोन; सॅमसंगला देणार जोरदार टक्कर

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने आपला शानदार Microsoft Surface Duo 2 ला लाँच केले आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला आहे. यासोबतच, दोन फोल्ड होणारी एचडी स्क्रीन आणि तीन कॅमेरे दिले आहेत. हा फोन आणि मोटोरोलाच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सला जोरदार टक्कर देणार आहे. फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Microsoft Surface Duo 2 चे स्पेसिफिकेशन सरफेस ड्यूओ २ फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ८.३ इंच स्क्रीन दिली आहे. जी फोल्ड केल्यावर ५.८ इंच होते. याचे रिझॉल्यूशन २७५४x१८९३ पिक्सल आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि नॉन एक्सपेंडेबल इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोन अँड्राइड ११ वर काम करतो. गेमिंगसाठी देखील हा शानदार फोन आहे. फोनची दुसरी स्क्रीन कंट्रोलर म्हणून वापरू शकता व Asphalt Legends 9, Modern Combat 5 आणि Dungeon Hunter 5 गेम्स खेळता येईल. Microsoft Surface Duo 2 चा कॅमेरा फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेंस आहे. फ्रंटला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Microsoft Surface Duo 2 ची बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी कंपनी या फोनच्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, वाय-फाय ६ आणि एनएफसी सपोर्ट मिळतो. Microsoft Surface Duo 2 ची किंमत स्मार्टफोन ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यांची क्रमशः किंमत १,४९९ डॉलर्स (जवळपास १,१०,६६० रुपये), १,५९९ डॉलर्स (जवळपास १,१८,०४१ रुपये) आणि १,७९९ डॉलर्स (जवळपास १,३२,८०६ रुपये) आहे. फोन Obsidian आणि Glacier रंगात येतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39vCXHu