Full Width(True/False)

iPhone 13 च्या लाँचिंगनंतर सुरू झाली iPhone 14 ची जोरदार तयारी, लीक झाले फीचर्स

नवी दिल्लीः Apple ने गेल्या आठवड्यात चार नवीन iPhone 13 मॉडल लॉन्च केले. ज्यात iPhone 13 मिनी, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max चा समावेश आहे. तुम्हाला आयफोन १३ सीरीज मधील आयफोन खरेदी करायचा असेल तर त्याआधी आयफोन १४ चे फीचर्स एकदा पाहून घ्या. सीरीज पुढील वर्षी धुमाकूळ घालणार आहे. जाणून घ्या आयफोन १४ सीरीज मध्ये कोणकोणते फीचर्स लीक झाले आहेत. आता Apple चे विश्लेषक Ming-Chi Kuo ने Apple iPhone 14 वरून एक लेटेस्ट रिसर्च रिपोर्ट जारी केले आहे. यांच्या माहितीनुसार, आणि Pro Max एक मोठा रिडिजाइन आणले जाणार आहेत, ज्यात नॉचला पंच होल कटआउट वरून बदलले जाईल. याशिवाय, दोन्ही प्रो मॉडल मध्ये 48MP चे कॅमेरे दिले जाणार आहेत. iPhone 14 सीरीज 2022 दुसऱ्या सहामाही मध्ये लाँच केली जाणार आहे. कुओने हाही उल्लेख केला आहे की, Apple पुढील वर्षी एक स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देणार नाही कारण हे २०२३ मध्ये असण्याची अफवा आहे. 5G सपोर्टचा एक नवीन iPhone येण्याचा अंदाज 2022 iPhone लाइनअपमध्ये वेनिला मॉडल मध्ये एक नवीन ६.७ इंचाचा नॉन प्रो आयफोनचा समावेश असेल. पुढील वर्षासाठी एक मिनी मॉडलचा कोणताही उल्लेख नाही. आधीच्या अफवावरून हे स्पष्ट होते की, अॅपल मिनी व्हेरियंट बनवणार नाही. ५जी सपोर्टचा एक नवीन iPhone SE सुद्धा 2022 च्या पहिल्या सहामाहीत रिलीज होण्याची शक्यता आहे. Kuo च्या नोट मध्ये लिहिले की, 2022 iPhones साठी हार्डवेयर सेलिंग पॉइंट मध्ये याचा समावेश आहे. १. 5G सपोर्टचा एक नवीन iPhone SE (1H22) २. एक नवीन आणि स्वस्त ६.७ इंचाचा iPhone (2H22) ३. दोन नवीन हाय अँड मॉडलचा समावेश आहे. एक पंच होल डिस्प्ले नॉच एरिया डिझाइनच्या जागी आणि एक 48MP वाइड कॅमेरा (2H22) मिळेल. कुओने ही सुद्धा भविष्यवाणी केली की, आम्ही २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत आयफोन साठी एक अंडर डिस्प्ले टच आयडी मिळणार नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AvoDL0