Full Width(True/False)

आज लाँच होणार सॅमसंगचा ‘हा’ स्वस्त ५जी स्मार्टफोन, मिळेल ६४MP कॅमेरा

नवी दिल्ली : आज आपल्या गॅलेक्सी एफ-सीरिजमधील नवीन Galaxy F42 5G ला लाँच करणार आहे. आज दुपारी १२ वाजता हा फोन लाँच होईल. ५जी बँड सपोर्टसह येणाऱ्या या फोनला ६ जीबी +१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाईल. रिपोर्टनुसार, फोनची किंमत जवळपास २० ते २१ हजार रुपये असू शकते. वाचा: गॅलेक्सी एफ४२ स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या मायक्रोसाइटवर लाइव्ह आहे. यावरून फोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल, हे स्पष्ट होते. तसेच, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून याची विक्री होईल. या फोनच्या फीचर्सविषयी जाणून घेऊया. सॅमसंग गॅलेक्सी F42 5G चे स्पेसिफिकेशन कंपनी गेल्याकाही दिवसांपासून फोनविषयी माहिती देत आहे. यावरून फोनमध्ये फुल एचडी+ इनफिनिटी व्ही डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येईल व याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज असेल. फोनला ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजमध्ये लाँच केले जाईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० SoC चिपसेटचा सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश आणि ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. यात नाइट मोड फीचरसह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंससरह येणाऱ्या या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली जाईल. फोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल की नाही, याबाबत मायक्रोसाइटवर माहिती दिलेली नाही. कनेक्टिव्हिटीसाठी यात १२ बँड ५जी सोबत ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिला जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3utyQWg