नवी दिल्लीः OnePlus च्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या चार्जर मध्ये आता ब्लास्ट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. केरळमधील राहणाऱ्या एका युजरने एक ट्विट करून सांगितले की, 5G स्मार्टफोनच्या चार्जरमध्ये अचानक स्फोट झाला आहे. युजरच्या माहितीनुसार, चार्जरमध्ये स्फोट झाला त्यावेळी फोन चार्जरसाठी पॉवर सॉकेट मध्ये लावलेला होता. ही घटना रविवारी घडली आहे. या घटनेत युजरचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी या घटनेमुळे त्याला मानसिक धक्का मात्र प्रचंड बसला आहे. बाहेरच्या कारणामुळे झाला चार्जरमध्ये स्फोट वनप्लस ने नॉर्ड २ च्या चार्जरमध्ये झालेल्या स्फोटाचे स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने चार्जरमध्ये स्फोटाला बाहेरच्या कारणाला जबाबदार धरले आहे. ज्यात जास्त व्होल्टेज फ्लकच्युएशनचा समावेश आहे. गॅझेट्स ३६० च्या रिपोर्ट्सनुसार, कंपनीने युजरला एक रिप्लेसमेंट चार्जर सुद्धा ऑफर केले आहे. कंपनीने गॅझेट्स ३६० ला लिहिलेल्या एका मेलमध्ये म्हटले की, आम्ही या पद्धतीच्या दाव्याला मोठ्या गंभीरतेने घेत आहोत. युजरने डॅमेज वनप्लस चार्जरला आमच्या सर्विस सेंटर मध्ये दिले आहे. त्याला एक रिप्लेसमेंट चार्जर देण्यात आले आहे. मॅन्यूअल मध्ये सांगितलेल्या सेफ्टी नियमांना फॉलो करा कंपनीने सांगितले की, वनप्लस चार्जर्समध्ये बिल्ट इन कॅपिसिटर लावलेले असतात. जे एनर्जीला कंट्रोल आणि स्टोर करतात. केरळमध्ये युजरसोबत झालेल्या या घटनेच्या तपासात कंपनीने पाहिले की, चार्जरमध्ये लावण्यात आलेल्या कॅपिसिटर्स ब्लास्ट नंतर आपल्या जागी होते. यालाच आधार मानून कंपनीने म्हटले की स्फोट बाहेरच्या कारणामुळे झाला आहे. कंपनीने युजर्सला सांगितलेल्या कारणात व्यवस्थित पालन करण्याचे आवाहन केले आहे. जुलैमध्ये केले होते फोनला लाँच वनप्लस नॉर्ड 2 5G ला कंपनीने भारतात यावर्षी जुलै मध्ये लाँच केले होते. फोनला तीन व्हेरियंट ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनची सुरुवातीची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेंसिटी 1200 AI SoC दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉटचे वॉर्प चार्जर सोबत येते. वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ieuFsc