Full Width(True/False)

Nokia चा धमाका ! ६ ऑक्टोबरला लाँच करणार Nokia T20 Tablet, फीचर आणि स्मार्टफोनवरुनही उठणार पडदा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: HMD Global ने ६ ऑक्टोबर रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली असून Nokia च्या या कार्यक्रमात कंपनी लाँच करू शकते. यापूर्वीही नोकियाने Nokia N1 Tablet २०१४ मध्ये लाँच केला होता. वाचा: इव्हेंटशी संबंधित Nokia च्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आमचे कुटुंब वाढत आहे. ६.१०.२१ ची वाट पाहत आहे. यासह, एक इमेज देखील शेयर करण्यात आली आहे. ज्यावर नोकियाचे फीचर फोन आणि स्मार्टफोन दिसत असून प्रतिमेमध्ये एक मोठा बॉक्स आहे जो टॅब्लेट असल्याचे दिसत आहे. यापूर्वीच्या अहवालात असे म्हटले होते की, कंपनी Nokia T 20 Tablet वर युनिसॉक प्रोसेसर आणि माली-जी ५२ सह काम करत आहे. हे डिव्हाइस Unisoc Tiger T618 किंवा Tiger T700 प्रोसेसरद्वारे समर्थित केले जाऊ शकते. यापूर्वी लिस्टिंगमध्ये हे उघड झाले होते की, हा Tablet 4G आणि वाय-फाय मॉडेलमध्ये लाँच केला जाईल. याशिवाय ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात स्मार्टफोन देखील लाँच होऊ शकतो. हा फोन अलीकडेच चीनमध्ये लिस्ट झाला होता. अहवालांनुसार, Nokia G50 5G मध्ये ६.८२ इंच (७२० × १६४० पिक्सेल) HD + डिस्प्ले असू शकतो. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर आणि एड्रेनो ६१९ जीपीयू दिले जाऊ शकतात. ६ जीबी / ८ जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनमध्ये ६४ जीबी / १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले जाण्याची शक्यता आहे. जे, मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. Nokia G50 5G स्मार्टफोन अँड्रॉइड ११ सह येत असल्याची देखील माहिती आहे. यामध्ये अल्ट्रा-वाइड आणि डेप्थ / मॅक्रो सेन्सर्स ४८ मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेरासह येतात. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, ३.५ मिमी ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ आणि स्प्लॅश रेझिस्टंट अशी वैशिष्ट्ये देखील असतील. बातमीनुसार, फोनचे परिमाण १७३.८०× ७७.६८ × ८.८५ मिलीमीटर आणि वजन २२० ग्रॅम असेल. Nokiaच्या या फोनमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.0, GPS, USB Type-C पोर्ट सारखी वैशिष्ट्ये असतील. तसेच, या फोनमध्ये ४८५० mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XKR75d