Full Width(True/False)

Redmi Smart TV वर २ हजारांपर्यंत फायदे, ३ ऑक्टोबरपासून नव्या टीव्हीचा सेल

नवी दिल्लीः Xiaomi चा सब-ब्रँड Redmi ने नुकतीच आपली नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. दोन साइज मध्ये येणाऱ्या रेडमीच्या या टीव्हीचा सेल ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. युजर या टीव्हीला अर्ली अॅक्सेस अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवरून २ ऑक्टोबरला ऑर्डर करू शकतात. तर अमेझॉन प्राइम यूजर्ससाठी टीव्ही ३ ऑक्टोबर पासून ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये उपलब्ध केले जाणार आहे. सेल सुरू होण्याआधी कंपनीने 'Diwali with Mi' मध्ये ऑफरच्या बेस्टट डीलची घोषणा केली आहे. कंपनीच्या नवीन स्मार्ट टीव्ही दोन डिस्प्ले साइज ३२ इंचा आणि ४३ इंच मध्ये येतात. ३२ इंचाच्या टीव्हीची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. दिवाळी ऑफर अंतर्गत कंपनी ३२ इंचाच्या व्हेरियंटवर यूजर्संना १५०० रुपयाचे बेनिफिट ऑफर करणार आहे. तसेच ४३ इंचाच्या मॉडलवर २ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट ऑफर करणार आहे. रेडमी स्मार्ट टीव्हीला ऑफर सोबत mi.com, Mi Home, अमेजन इंडिया च्या सर्व Mi स्टोर्स वरून खरेदी केले जावू शकते. रेडमी स्मार्ट टीव्हीचे फीचर आणि स्पेसिफिकेशन रेडमीचे लेटेस्ट ४३ इंच आणि ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीत अनेक फर्स्ट इन सेगमेंट फीचर दिले आहेत. यात DTS Virtual X, DTS-HD, Dual Band WiFi, IMDb इंटीग्रेशन सोबत PatchWall 4 आणि डॉल्बी ऑडियो चा समावेश आहे. रेडमीचे हे नवीन टीव्ही अँड्रॉयड ११ ओएसवर काम करते. या टीव्हीत ४३ इंचाच्या व्हेरियंट मध्ये कंपनी फुल एचडी आणि ३२ इंचाच्या व्हेरियंट मध्ये ७२० पिक्सल रिझॉल्यूशनचा डिस्प्ले ऑफर करीत आहे. दमदार साउंडसाठी दोन्ही टीव्हीत २० वॉटचे स्पीकर दिले आहे. डॉल्बी एटमॉस सपोर्ट याचा आवाज आणखी चांगला करतो. टीव्हीत गेमिंगसाठी ऑटो लो लेटेंसी मोड आणि MIMO टेक्नॉलॉजी दिली आहे. जी स्पीडला वाढवण्याचे काम करते. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ ५.०, दोन यूएसबी २.० पोर्ट, एक इथरनेट पोर्ट, AV पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक पोर्ट दिले आहे. या टीव्हीत कंपनीने खास करून इंडियन युजर्ससाठी डिझाइन केली आहे. यात १५ हून जास्त भाषेला सपोर्ट करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DdKQyn