Full Width(True/False)

गुड न्यूज! WhatsApp यूजर्संना पेमेंट केल्यानंतर मिळणार कॅशबॅक, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली: युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय मेसेजिंग App लवकरच भारतीय युजर्सना WhatsApp प्लॅटफॉर्मवरून पेमेंट केल्यावर कॅशबॅक देणार असून या बक्षीस प्रणालीची सध्या चाचणी सुरू आहे. पूर्वी, युजर्सच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मवर पेमेंट चॅटचा पर्याय जोडण्यात आला होता. विशेष म्हणजे, WhatsApp पेमेंट फीचर प्रथम भारत आणि ब्राझील मध्येच लाँच करण्यात आले होते. वाचा: WhatsApp च्या नवीन फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या वेबबेटा इन्फो या वेबसाईटनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या नवीन कॅशबॅक फिचरची चाचणी करत आहे. स्क्रीनशॉटनुसार कॅशबॅक बॅनर चॅट विंडोच्या शीर्षस्थानी आहे. Get on your next payment त्यावर लिहिले आहे. अद्याप हे स्पष्ट नाही की, कॅशबॅक सर्व युजर्ससाठी उपलब्ध असेल किंवा त्या वापरकर्त्यांसाठी जे त्यांचे पहिले पेमेंट व्हॉट्सअॅप पेमेंटद्वारे करतील. व्हॉट्सअॅपने कॅशबॅक फीचरच्या स्टेबल लॉंचिंग बाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हे वैशिष्ट्य लवकरच वापरकर्त्यांसाठी जारी केले जाईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. मेसेज Reaction फीचरवरही काम सुरु : कॅशबॅक फीचर व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप मेसेज Reaction फीचरवरही काम करत आहे. हे वैशिष्ट्य सुरू केल्यामुळे,युजर्स कोणत्याही चॅटमध्ये जाऊ शकतील आणि स्टिकर्स, जीआयएफ आणि इमोजीद्वारे त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतील. यामुळे युजर्च्या चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला होईल . येत्या काही दिवसांमध्ये हे वैशिष्ट्य सादर केले जाऊ शकते. मार्चमध्ये लाँच करण्यात आले होते हे फिचर WhatsApp ने मार्चमध्ये यूजर्ससाठी म्यूट व्हिडिओ फीचर सादर केले. या फीचरची विशेषता म्हणजे युजर्स कोणताही व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्याला म्यूट करू शकतात. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, प्रथम चॅट विंडोवर जाऊन जिथे तुम्हाला आवाजहीन व्हिडिओ पाठवायचा आहे. व्हिडिओ निवडल्यानंतर डाव्या बाजूला स्पीकर बटण दिसेल, त्यावर क्लिक करा. हे करताच व्हिडिओचा आवाज म्यूट केला जाईल वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Zq6ErN