Full Width(True/False)

२२४ जीबी पर्यंत डेटा आणि ७० दिवसांपर्यंत वैधता, पाहा ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील Vi प्लान्स

नवी दिल्लीः under 500: नेटवर्क प्रोवाइडर कंपन्यांनी टॅरिफच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच अनेक कमी वैधतेसोबत बेनिफिट्स दिले जात आहे. काही प्लानमध्ये कमी डेटा दिला जात आहे तर काही नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्या काही प्लानमध्ये टॅरिफ वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. देशातील दिग्गज नेटवर्क प्रोवाइडर कंपनी Vodafone Idea (Vi) कडे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील दोन जबरदस्त प्लान आहेत. कमी किंमतीत चांगले बेनिफिट्स मिळतात. जाणून घ्या डिटेल्स. यातील पहिला प्लान डबल डेटा बेनिफिट देतो. याची किंमत ४४९ रुपये आहे. Vodafone Idea (Vi) ने तेलंगाना आणि आंध्र प्रदेश सर्कल मध्ये डबल डेटा ऑफर बंद केले आहे. परंतु, कंपनी आता बाकीच्या टेलिकॉम सर्कलमध्ये डबल डेटा बेनिफिट देत आहे. वोडाफोन आयडियाचा ४४९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्य रोज २ जीबी प्लस २ जीबी म्हणजे ४ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवसाची दिली जाते. या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग अनलिमिटेड दिली जाते. या प्लानमध्ये २२४ जीबी डेटा ऑफर केले जाते. या प्लानमध्ये रोज १०० SMS मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर मिळते. याशिवाय, ऑल नाइट डेटा मिळतो. अन्य फायदे म्हणजे या प्लानमध्ये Vi Movies आणि TV चे अॅक्सेस मिळते. वोडाफोन आयडियाचा ४९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ७० दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. प्लानमध्ये एकूण १०५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये १०० एसएमएस मिळते. या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर मिळतो. याशिवाय, नाइट डेटा मिळतो. अन्य फायदे म्हणजे या प्लानमध्ये Vi Movies आणि TV चे अॅक्सेस मिळते. हे दोन्ही प्लान ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर तुम्ही ४४९ रुपयाचा प्लान रिचार्ज करू शकता. जर तुम्हाला जास्त वैधता हवी असेल तर तुम्ही ४९९ रुपयाचा प्लान खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zyWamj