Full Width(True/False)

WhatsApp मध्ये लवकरच येत आहेत हे दोन फीचर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः : इंस्टेंट मेसेजिंग अॅप आपल्या IOS यूजर्ससाठी लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. याचे नाव मल्टी-डिवाइस 2.0 (Multi-Device 2.0) आहे. परंतु, लाँचिंग आधी या आगामी फीचरला आता बीटा व्हर्जनवर पाहिले गेले आहे. याशिवाय, IOS आणि Android प्लॅटफॉर्म वर मेसेज रिअॅक्शन फीचर जोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. वेबबीटा इंफोच्या माहितीनुसार, WhatsApp मल्टी-डिवाइस 2.0 फीचरवर काम करीत आहे. हे फीचर आल्यानंतर वेगवेगळ्या डिव्हाइसवर व्हाट्सअॅप अकाउंट चालवता येवू शकते. रिपोर्ट मध्ये पुढे म्हटले की, या फीचरचा सपोर्ट लवकरच अँड्रॉयड युजर्संना मिळणार आहे. कंपनीकडून अजून या फीचरची अधिकृत लाँचिंगवरून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. WhatsApp Message Reactions फीचर मल्टी-डिवाइस शिवाय व्हाट्सअॅप Message Reactions फीचरला लाँच करण्याची तयारी करीत आहे. या फीचरला नुकतेच iOS प्लॅटफॉर्मवर पाहिले गेले होते. आता हे फीचर अँड्रॉयड 2.21.20.8 बीटा वर्जनवर उपलब्ध आहे. ही माहिती वेब बीटाच्या लेटेस्ट रिपोर्टवरून मिळाली आहे. व्हाट्सअॅपचे हे फीचर इंस्टाग्राम रिअॅक्शन प्रमाणे काम करतो. युजर्स कोणत्याही मेसेजवर इमोजीचा वापर करून आपली प्रतिक्रिया देवू शकतो. या फीचरचा उपयोग करण्यासाठी यूजरला मेसेजवर लॉग प्रेस करावे लागणार आहे. यानंतर युजर्संना मेसेजच्या वर सर्व इमोजी दिसेल. युजर्स आपल्या हिशोबाप्रमाणे कोणत्याही एका इमोजीवर क्लिप करून मेसेजला प्रतिक्रिया देवू शकतात. मीडीया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या मेसेज रिअॅक्शन फीचरची टेस्टिंग सुरू आहे. या फीचरला लवकरच सर्व यूजर्ससाठी जारी करण्यात येणार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zMITGT