Full Width(True/False)

Xiaomi Mi TV ला टक्कर देण्यासाठी आला नवा स्मार्ट टीव्ही, किंमत फक्त १२,९९९ रुपये

नवी दिल्लीः जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी मार्केट मध्ये आणखी एक ऑप्शन आला आहे. चीनची टेक कंपनी ने भारतात आपला नवा स्मार्ट टीव्ही S3U Pro ला लाँच केले आहे. ३२ इंचाच्या डिस्प्ले साइजच्या या टीव्हीची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, याला ऑफर अंतर्गत कंपनीचा लेटेस्ट स्मार्ट टीव्ही तुम्ही फ्लिपकार्टवरून १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. कंपनीने ही सुद्धा घोषणा केली आहे की, या टीव्हीला युजर ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान १२ हजार ९९९ रुपयाच्या इंट्रोडक्ट्री किंमतीत खरेदी करू शकतात. Coocaa च्या या नवीन स्मार्ट टीव्हीची टक्कर मार्केट मध्ये आधीच उपलब्ध असलेल्या शाओमीच्या Mi LED TV 4A Pro शी होईल. शाओमीच्या या टीव्हीची किंमत आता १६ हजार ९९९ रुपये आहे. जाणून घ्या या टीव्हीची किंमत आणि फीचर्स संबंधी. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स टीव्हीत कंपनी 1366x768 पिक्सल रेजॉलूशन सोबत ३२ इंचाचा डायरेक्ट व्ह्यू एलईडी पॅनेल ऑफर करीत आहे. टीव्हीत तुम्हाला पाच पिक्चर मोड स्टँडर्ड, विविड, गेम, मूव्ही आणि स्पोर्ट्स पाहायला मिळतील. कंपनीचा दावा आहे की, हा बजेट स्मार्ट टीव्ही चांगला डिटेल आणि ऑप्टिमाइज्ड कलर सोबत जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी ऑफर करणार आहे. दमदार साउंड क्वॉलिटीसाठी या स्मार्ट टीव्हीत १० वॉटचे स्पीकर दिले आहेत. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा टीव्ही डॉल्बी ऑडियो आणि Coocaa च्या साउंड ऑडियो इनहँस्ड सराउंड (AES) ला सपोर्ट करतो. टीव्ही कंपनीच्या Coolita OS वर काम करतो. टीव्हीत इंटरटेनमेंटसाठी यूट्यूब अॅप सोबत CC Plus दिले आहे. Coolita OS मध्ये प्री-इंस्टॉल्ड क्लाउड गेम्स, इन-बिल्ट इंटरनेट ब्राउजर, एक अॅप स्टोर शिवाय, अनेक ऑप्शन मिळतात. हा टीव्ही CC Cast सपोर्ट सोबत येतो. याच्या मदतीने युजर्स अँड्रॉयड स्मार्टफोनच्या कंटेट थेट टीव्हीवर पाहू शकतो. टीव्हीत Eye Protection मोड सुद्धा दिले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DE1gku