Full Width(True/False)

फक्त १० मिनिटात Xiaomi चा ‘हा’ टॅबलेट झाला 'आउट ऑफ स्टॉक', पाहा यात काय आहे खास?

नवी दिल्ली : ने १५ सप्टेंबरला यूरोपमध्ये टॅबलेटला लाँच केले होते. २३ सप्टेंबरपासून या डिव्हाइसची विक्री सुरू झाली होती. कंपनीचा दावा आहे की, पहिल्या सेलच्या केवळ १० मिनिटात टॅबलेटचे सर्व यूनिट्स सोल्ड आउट झाले. डिव्हाइसचा पहिला सेल २४ तासांसाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त मागणी पाहिला मिळाली. केवळ १० मिनिटात डिव्हाइसच्या सर्व यूनिट्सची विक्री झाली. वाचा: कंपनीने मात्र अद्याप सेलमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या यूनिट्सच्या संख्येची माहिती दिलेली नाही. ऑनलाइन अभ्यास सुरू असल्याने टॅबलेटची मागणी देखील वाढली आहे. एमआय पॅड ५ ची किंमत २९९ यूरो (जवळपास २५,९९९ रुपये) आहे. Xiaomi Pad 5: स्पेसिफिकेशन्स एमआय पॅड ५ मध्ये ११ इंचाची मोठी एलसीडी स्क्रीन दिली आहे. याचे रिझॉल्यूशन २५६०x१६०० पिक्सल आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि पिक्सल डेंसिटी २७५ पीपीआय आहे. शाओमीच्या या टॅबलेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसर व ६ जीबी रॅम दिली आहे. डिव्हाइस १२८/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येते. डिव्हाइसमध्ये एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सल कॅमेरा मिळते. यात फेस अनलॉक सपोर्ट दिला आहे. हँडसेटमध्ये बिल्ट-इन स्पीकर्स मिळतात. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ८७२० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन MIUI ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. यात कस्टम इनपूट मेथड, स्पिलिट स्क्रीन, स्मॉल विंडोजसारखे फंक्शन मिळतात. दरम्यान, कंपनीने पुढील सेलचे कधी आयोजन केले जाईल याबाबत माहिती दिलेली नाही. प्रोडक्ट पेजवर 'Notify Me' बटन दिले आहे. यावर क्लिक केल्यानंतर सेलच्याबाबत माहिती दिली जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zCyNIs