नवी दिल्लीः अमेझॉनची ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये एक प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल तर शाओमी त्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने आपला प्रीमियम फोन (८जीबी+१२८ जीबी) वर सेलमध्ये ७ हजार रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट ऑफर करीत आहे. ७ हजार रुपयाचा फ्लॅट डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट करावे लागणार आहे. Deal of the Day मध्ये ११ हजारांची सूट अमेझॉनवर हा फोन आधीच Deal of the Day मध्ये ११ हजार रुपयाच्या डिस्काउंटनंतर ३६ हजार ९९९ रुपयाच्या किंमती सोबत लिस्टेड आहे. दोन्ही ऑफर मिळाल्यास फोनवरचा डिस्काउंट १८ हजार रुपयाचा होतो. यासोबतच ही कंपनी या फोनच्या खरेदी वर ५ हजार रुपयाचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस सुद्धा देत आहे. तर तुम्ही जर प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला ६ महिन्यासाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट सुद्धा मिळेल. Mi 11X Pro चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये कंपनी 1080x2400 पिक्सल रेजॉलूशनचा ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डॉट डिस्प्ले ऑफर करते. हा डिस्प्ले अल्ट्रा टायनी पंच होल सोबत येते. फोनमध्ये मिळणारा डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा HDR 10+ ला सपोर्ट करतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा सुपर मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी कंपनीने या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4520mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lhs96N