Full Width(True/False)

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सेलला टक्कर देण्यासाठी Apple कडून शानदार फेस्टिव्ह ऑफरची घोषणा

नवी दिल्ली: फ्लिपकार्ट आणि Amazon इंडिया नंतर आता Apple ने भारतातील फेस्टिव्ह सीजन डोळ्यासमोर ठेवून एक मोठी ऑफर जाहीर केली आहे. कंपनीच्या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना आणि iPhone 12 मिनीच्या खरेदीवर मोफत AirPods मिळतील. ग्राहकांना ७ ऑक्टोबरपासून या ऑफरचा लाभ घेता येईल. वाचा: मायक्रोसाइट लाईव्ह : Apple फेस्टिव्ह ऑफरची मायक्रोसाइट अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झाली आहे. मायक्रोसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, iPhone 12 आणि 12 Mini च्या खरेदीवर ग्राहकांना मोफत AirPods मिळतील. iPhone 12 आणि ची किंमत iPhone 12 ची सुरुवातीची किंमत ६५,९०० रुपये आणि iPhone 12 Mini ची किंमत ५९,९०० रुपये आहे. या उपकरणांच्या किंमतीवर कोणतीही सूट दिली जाणार नाही. या दोन्ही iPhone च्या खरेदीवर AirPods उपलब्ध असतील. कंपनीच्या मते, ग्राहक वायरलेस चार्जिंग केसशिवाय AirPods आणि वायरलेस चार्जिंग केस असलेल्या AirPodsमध्ये निवड करू शकतील. यानंतर, कंपनी फोन आणि इयरबड्सच्या किंमतीवर आधारित अंतिम किंमत ठरवेल. या क्षणी, या ऑफरशी संबंधित फार माहिती नाही, म्हणून iPhone 12 किंवा 12 Mini सह एअरपॉड्स विनामूल्य दिले जातील की नाही हे सांगणे सध्या तरी थोडे कठीण आहे. iPhone 12 ची वैशिष्ट्ये : iPhone 12 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर एचडी डिस्प्ले आहे. त्यात A14 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये मॅगसेफ चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट असून स्मार्टफोनमध्ये iOS 15 ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट आहे. iPhone 12 मध्ये उत्कृष्ट फोटो काढण्यासाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये १२ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि वाइड अँगल लेन्स आहे. तर फोनच्या पुढील भागाला सेल्फीसाठी १२ एमपी कॅमेरा मिळेल. iPhone 12 मिनीची वैशिष्ट्ये : iPhone 12 मिनी ५.४ इंच डिस्प्लेसह येतो. या फोनमध्ये A14 बायोनिक चिप देण्यात आली असून . यासह, फोनमध्ये १२ MP चा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. याशिवाय फोनच्या फ्रंटमध्ये १२ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, हे डिव्हाइस iOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZBK2Vd